👁 10 Views

पुलवामा दहशतवादी हल्ला…या दहशतवाद्याने घडवला हल्ला

पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2019



पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सीआरपीएफचा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात होता. या ताफ्यात २५ बस होत्या. सुमारे अडीच हजार जवान या ताफ्यात होते. 
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवल्याची माहिती समोर येत आहे.

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सीआरपीएफचा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात होता. या ताफ्यात २५ बस होत्या. सुमारे अडीच हजार जवान या ताफ्यात होते.  अवंतीपोरा येथे महामार्गावर स्फोटाने भरलेल्या कारने दोन बसला धडक दिली. हल्ल्याच्या काही वेळानंतरच पाकिस्तानमधील जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
गेल्या तीन वर्षांमधील उरीनंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये उरी येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते.

हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आदिलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आदिलने ‘लवकरच विजय मिळणार, इन्शा अल्लाह!’, असे म्हटले आहे. आदिल हा पुलवामा येथील रहिवासी असल्याचे समजते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *