👁 10 Views

हाफिज सईदने दिलेली धमकी खरी ठरली ! राष्ट्रीय सुरक्षेविषयी शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक

पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2019

भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पंढरपूर लाईव्हकडून भावपूर्ण आदरांजली…. व्यर्थ न हो बलिदान….
जम्मु-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याआधी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी अनेक रॅली घेतल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, 5 फेब्रुवारी रोजी जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या झालेल्या एका रॅलीमध्ये भारतावर हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.
‘आज तक’च्या वृत्तानुसार, जैश- ए- मोहम्मदच्या कराची येथील रॅलीमध्ये संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड अफजल गुरूच्या नावाखाली आत्मघाती हल्लेखोरांचं पथक बनवण्याची घोषणा केली होती. आत्मघाती हल्लेखोरांची सात पथकं भारताच्या विविध शहरांमध्ये रवाना झाली आहेत अशी घोषणा या रॅलीमध्ये करण्यात आली होती. याशिवाय रॅलीदरम्यान दहशतवादी हाफिज सईदने पंतप्रधान मोदींच्या नावाने धमकी देत, ‘मोदी तुमची फौज घेऊन काश्मीरमधून परत जा असा इशारा दिला होता. जर फौज घेऊन काश्मीरमधून गेला नाहीत तर बरंच काही गमवावं लागेल’ अशी धमकी सईदने दिली होती. सईदच्या या धमकीनंतर आता काश्मीरमध्ये सर्वात मोठी दहशतवादी हल्ला झाला आहे.
दरम्यान, भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेविषयी शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. वृत्तसंस्था एएनआयने हे वृत्त दिलंय. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय हल्ल्याच्या चौकशीसाठी एनआयएच्या 12 सदस्यांचं पथक देखील विशेष विमानाने घटनास्थळी पोहोचणार आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *