👁 11 Views

भारतीय हवाई दलानं पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला… पंढरीत फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून केला जल्लोष

Pandharpur LIVE 26 February 2019





Video News



काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहाशतवादी हल्ल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी भारतीय हवाईदलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला करत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाईदलानं ’मिराज 2000’ या 12 लढाऊ विमानांच्या मदतीनं बालाकोट आणि चाकोटी येथील तळांवर एक हजार किलो वजनाचे बॉम्ब टाकले. भारतीय हवाई दलाच्या मिराज फायटर विमानांनी पहाटे 3.30 च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. इंडियन एअर फोर्सने पीओकेमधील बालकोट येथे हवाई हल्ला करुन जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा तळ नष्ट केला आहे. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.


काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहाशतवादी हल्ल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी भारतीय हवाईदलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला करत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय एअरफोर्सने केलेल्या या पराक्रमाचा जल्लोष आज पंढरीत साजरा करण्यात आला. 



📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


पंढरपूरमध्ये पश्‍चिमद्वार व्यापारी संघटनेने मोठा जल्लोष साजरा केला. पश्‍चिमद्वार येथे सर्व व्यापार्‍यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत भारतमाता की जय, वंदे मातरम्, जय हिंद, पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देत भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्याचे कौतुक केले. व्यापार्‍यांनी भाविकांना पेढे वाटुन आपला आनंद व्यक्त केला. 


यावेळी पश्‍चिमद्वार व्यापारी संघटनेचे, बाबाराव महाजन, भागवत बडवे महाजन, यशवंत पवार, जेष्ठ व्यापारी प्रभाकर कौलवार, अशोक खंडागळे, राजु कौलवार, सौरभ बडवे, कौस्तुभ गुंडेवार, व इतर अनेक व्यापारी, वारकरी भाविक व पंढरपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे केलेल्या कारवाईला केंद्र सरकारने दुजोरा दिला आहे. भारतीय हवाई दलाने कारवाई करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती परराष्ट्र विभागाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिले. 

हवाई दलाच्या कारवाईबाबत माहिती देताना गोखले यांनी सांगितले की, ’जैश-ए-मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना भारतात आणखी आत्मघातकी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. बालाकोट परिसरात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या विविध 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *