Pandharpur LIVE 26 February 2019
Video News
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहाशतवादी हल्ल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी भारतीय हवाईदलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला करत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाईदलानं ’मिराज 2000’ या 12 लढाऊ विमानांच्या मदतीनं बालाकोट आणि चाकोटी येथील तळांवर एक हजार किलो वजनाचे बॉम्ब टाकले. भारतीय हवाई दलाच्या मिराज फायटर विमानांनी पहाटे 3.30 च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. इंडियन एअर फोर्सने पीओकेमधील बालकोट येथे हवाई हल्ला करुन जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा तळ नष्ट केला आहे. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहाशतवादी हल्ल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी भारतीय हवाईदलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला करत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय एअरफोर्सने केलेल्या या पराक्रमाचा जल्लोष आज पंढरीत साजरा करण्यात आला.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
https://play.google.com/store/apps/details…
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com


