पंढरपूर तहसिल कचेरीत 1910 पासुनच्या जुन्या जीर्ण महत्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनींग सुरु

पंढरपूर (भगवान वानखेडे):-

पंढरपूर तहसिल कार्यालयात 1910 पासुनच्या जुन्या जीर्ण झालेल्या महत्वाच्या नोंदी असणार्‍या कागदपत्रांचे स्कॅनींग चालु असून यामध्ये जुने सात बारा, जुने फेरफार, 8 अ, क.ड.ई. पत्रक, ईनामपत्रक,जन्म-मृत्यु रजिस्टर आदी महत्वाच्या कागदपत्रांचे कॉम्प्युटराईज्ड स्कॅनींग करणेचे काम चालु असून हे काम अतिशय महत्वपुर्ण आहे. यामुळे नागरिकांना आपल्या कागदपत्रांची व त्यावरील नोंदींची माहिती मिळणेची कामे तत्परतेने व पारदर्शकतेने होतील.
                 कार्यालयात असणारे अ दर्जाचे जुने 7/12 एकुण 3045 नोंदवह्या/पुस्तकांमधील एकुण 456750 पानांचे स्कॅनींग, अ दर्जाच्या जुन्या फेरफाराच्या 6570 नोंदवह्या/पुस्तकांमधील एकुण 328500 पानांचे स्कॅनींग,  अ दर्जाच्या क.ड.ई. पत्रकांच्या 240 नोंदवह्या/पुस्तकांमधील एकुण 24000 पानांचे स्कॅनींग, अ दर्जाच्या इनामपत्रकांच्या 60 नोंदवह्या/पुस्तकांच्या   एकूण 600 पानांचे स्कॅनींग, जन्म-मृत्यु रजिस्टरच्या 4060 नोंदवही/पुस्तकांमधील एकुण 60900 पानांचे स्कॅनींग करणेचे कार्य 15 ऑक्टोबर 2015 पासुन चालु झाले आहे. 2 मशिन्स् च्या माध्यमातून हे काम चालु असून मर्यादीत कालावधीमध्ये हे काम पुर्ण करण्यासाठी आणखी मशिन्स् व कर्मचारी वाढविण्यात येतील या कामाचे कॉन्ट्रॅक्ट हैद्राबाद येथील एका खाजगी  कंपनीला जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.  दररोज दोन ते तीन हजार कागदपत्रांचे स्कॅनींग होत आहे. एकुण 13995 नोंदवह्या/पुस्तकांमधील एकुण 870750 पानांचे स्कॅनींग करावयाचे काम चालु असून लवकरच ही सर्व कागदपत्रे नागरिकांना नव्या स्वरुपात मिळतील अशी माहिती  नायब तहसिलदार सीमा सोनवणे यांनी दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *