-षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त सर्वपक्षीय नागरी सत्कार
-हजारो चाहते व मान्यवरांची उपस्थिती
नागपूर, २७ मे
मी माझ्या राजकीय आयुष्यात कधीही समीकरणे मांडली नाहीत, लाभ-हानीचा विचार केला नाही. केवळ सकारात्मक भूमिका घेऊन विकासाच्या कामात पक्षीय भेदाभेद विसरून प्रत्येक माणसाचे काम केले. माझ्या नशिबाने मला चाहते व नागरिकांचे अधिक प्रेम व आशीर्वाद मिळाले. आता मला कोणत्याही पदाची आकांक्षा नाही. भविष्यात गरीब, गरजू व दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत राहीन, असा विश्वास आज भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.
नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त नागरी सत्कार समितीतर्फे स्थानिक कस्तुरचंद पार्क येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पांडुरंग फुंडकर, केंद्रीय मंत्री विजयकुमार गोयल, ऍड. सुलेखा कुंभारे, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, आचार्य बाळकृष्ण, ना. चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे, माजी मंत्री एक़नाथ खडसे, ना. गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार विजय दर्डा, अभिनेते विवेक ओबेराय, प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच सत्कार समितीचे संयोजक गिरीश गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाल्यामुळे प्रारंभीच्या काळात आर्थिक स्थिती बेताची होती आणि तो काळ आमच्या विचारधारेला अनुकूल नव्हता. त्यामुळे उपहास, अपमान सहन करीत स्वत:चे पैसे खर्च करून भाजपाचे काम केले. मात्र मध्यंतरीच्या काळात पवार, मुंडे, राणे, शिंदे यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळाले. या सर्वांकडून मी एक शिकलो, ते म्हणजे राजकारणात सकारात्मक भाव असणे आवश्यक आहे. मी कधीही कामात पक्षाचा अभिनिवेश आणला नाही. विचारात मतभेद आहेत, पण मनभेद ठेवला नाही. मला राजकारणात समीकरण मांडणे कधीही जमले नाही. मी कधीही कुणाचे पोस्टर लावले नाही, स्वागत केले नाही, कुणाकडे बायोडाटा देखील दिला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारामुळे तसेच प्रारंभीच्या काळात श्रद्धेय बाळासाहेब व भाऊराव देवरस यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गतकाळात पक्षासाठी काम करणार्या जुन्या कार्यकर्त्यांच्या कामाची जाणीव ठेवली. पराजयाने खचून न जाता काम करत राहण्याची प्रेरणा या लोकांकडून मिळाली, असेही यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले.
विकासकामांविषयी बोलताना, आज विकास करण्याची कटिबद्धता हवी. पैसा भरपूर आहे. या क्षेत्रात काम करणार्यांची कमतरता असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. येत्या काळात पेट्रोलियम पदार्थांची आयात बंद करून कृषी क्षेत्रातून बायोडिझेल, बायोफ्युएल तयार करण्याचे काम करीत आहे. अनेक प्रयोगात लोक मला हसले. पण आज ती बाब प्रत्यक्षात उतरत आहे. हे पाहून समाधान वाटते, असेही त्यांनी यावेळी सांगितले
सत्कार सोहळ्याच्या प्रारंभी संगीतमय कार्यक्रमानंतर नितीन गडकरी यांचा सचित्र जीवनपट सादर करण्यात आला. मान्यवरांच्या स्वागतानंतर अमर कुळकर्णी यांनी वंदे मातरम् सादर केले. गडकरींच्या सन्मानार्थ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा लेखी संदेश, तर श्री श्री रविशंकर यांचा व्हीडिओ संदेश उपस्थितांपुढे मांडण्यात आला. या कार्यक्रमात ‘संसद से गडकरी’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. यानंतर देवेंद्र व अमृता फडणवीस यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, भेटवस्तू तसेच कांचन गडकरी यांना सौभाग्य अलंकार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एक कोटी एक लक्ष रुपयांच्या निधीचा धनादेश गडकरींच्या सुपूर्द करण्यात आला. ही राशी सामाजिक संस्थांना प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी, तर आभारप्रदर्शन पालकमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी केले.

नेव्हर डाय ऍटिट्यूटचे मानकरी : देवेंद्र फडणवीस
नितीन गडकरी हे अतिशय निराळ्या स्वरूपाचे रसायन आहे. प्रचंड आत्मविश्वास, उच्च मनोधैर्य आणि बोलेन ते करून दाखविणार या मानसिकतेसह काम करणारे नितीनजी आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत. अशक्य ती बाब साकारण्याची क्षमता म्हणजेच नेव्हर डाय ऍटिट्यूडचा मानकरी असलेला नेता म्हणजे नितीन गडकरी असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते केवळ स्वप्न पाहात नाही तर ते पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात. त्याचप्रमाणे आज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नितीन गडकरी हे समीकरण झाले असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या अजेंड्यावर गाव, गरीब, मजदूर व किसान हे प्राधान्यक्रमावर असल्याचे सांगितले.
सामान्यांचा मोठा मदतनीस : सुशीलकुमार शिंदे
मी मुख्यमंत्री असताना नितीन गडकरी यांनी मला छळले आहे. ते विधानपरिषदेत असताना त्यांनी एक़दा कामकाज बंद पाडले. मात्र विरोधात राहून देखील सामान्यांची मदत करणारा मोठा नेता या पद्धतीने काम केले. गडकरी कुणालाही घाबरत नाहीत. संतविचार व देशाची काळजी करणारा हा नेता असल्याचे मत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
ध्येय बाळगणारा नेता : रामदास आठवले
नितीन गडकरी हे चांगले काम करणारे नेते आहेत. गडकरींनी विकासाचे ध्येय ठेवले आहे व ते बाळगणारे नेते असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मी बाबासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी कार्यरत आहे. दोघेही ध्येयाने प्रेरित असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्तृत्ववान, द्रष्टा संघटक : शरद पवार
नितीन गडकरी हे कर्तृत्ववान, द्रष्टे व कुशल संघटक आहेत. विकासासाठी कामे करणारा नेता व त्यासाठीच त्याचा सर्वपक्षीय सत्कार होत आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. आपल्या कामाने एका मराठी माणसाने संसदेचा विश्वास कमाविला. भाजपामध्ये चौकटीत राहून काम करण्याची परंपरा तोडणारा नेता असल्याचेही पवार यांनी सांगितले.
ज्ञान, भक्ती व कर्माचा त्रिवेणी संगम : शिवराजसिंह चौहान
गडकरींच्या ठायी ज्ञान, भक्ती व कर्म या तीनही गुणांचा संगम आहे. राजकारणात देखील ते ही पथ्ये पाळतात. काम करताना ते कोणताही पक्ष व राज्य असा भेदभाव करीत नाहीत. तसेच उत्साह व धैर्याचे प्रतीक असल्याचे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.
देशाचे नेतृत्व करण्याची ़क्षमता : डॉ. रमणसिंग
मूलभूत सोयींचा विकास करण्याचे ध्येय गडकरी यांनी राखले असून ते सातत्याने त्याच बाबींचा विचार करीत असतात. त्यांची कामाची पद्धत ही देशाची नेतृत्व करण्याची क्षमता दर्शविणारी असल्याचे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग यांनी व्यक्त केले.