👁 11 Views

डीएड, बीएड विद्यार्थ्यांना सरकारी शाळांत शिकवणे सक्तीचे

मनुष्यबळ विकास मंत्री जावडेकरांचे वक्तव्य
नवी दिल्ली, २७ मे 
डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये शिकवणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. शिवाय बनावट प्रकारामुळे देशातील तीन हजार डीएड, बीएड महाविद्यालये बंद करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, सक्तीच्या निर्णयामुळे खासगी शाळांमधून खोटी प्रमाणपत्रे घेण्याचे प्रकार थांबतील. सरकारी शाळांमधून अशी प्रमाणपत्रे मिळविणे सोपे नसल्याने त्यावर आपोआप आळा बसेल. शिवाय या भावी शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या फीडबॅकला अधिक महत्त्व मिळेल.
देशातील सुमारे तीन हजार शिक्षणशास्त्र अध्यापन पदविका महाविद्यालये (डीएड) आणि अध्यापक पदवी महाविद्यालयांची (बीएड) मान्यता रद्द करण्यात येईल. शैक्षणिक क्षेत्रात डीएड, बीएड महाविद्यालयाची प्रशासने, पालक आणि पाल्यांची अक्षरश: लूट करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाकडून सविस्तर माहितीचे प्रतिज्ञापत्र मागविण्यात आले होते. वारंवार इशारा दिल्यानंतरही सुमारे तीन हजार महाविद्यालयांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने त्या संस्था बनावट असल्याचे दिसून येत आहे. केवळ कागदोपत्री अस्तित्व असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *