👁 12 Views

स्वा. सावरकर जयंती उत्साहात साजरी

स्वातंत्र्यवीर सावरकरांची 134 वी जयंती सावरकर पुतळा परिसरात संपूर्ण दिवसभर मोठ्या
प्रमाणात उत्साहात साजरी झाली. सर्वप्रथम या पुतळ्याचे पुजन पंढरपूरचे प्रथम नागरिक नगराध्यक्षा
सौ. साधना भोसले व मा. उपनगराध्यक्षा सौ. सुजाता बडवे महाजन यांच्या शुभहस्ते व श्रीमंत
सुधाकरपंत परिचारक व भागवताचार्य वा. ना. उत्पात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्या
प्रसंगी अभय इचगांवकर, विवेक बेणारे, मा. नगरसेविका सौ. वैष्णवी बेणारे, मा. उपनगराध्यक्ष नागेश
भोसले, प्रशांत खंडागळे विविध संस्थांचे पदाधिकारी व नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या
प्रसंगी स्वा. सावरकर चळवळ व पंढरपूर या विषयी उद्बोधक व्याख्यान अभयसिंह इचगांवकर यांनी
दिले. तर मा. वा. ना. उत्पात यांनी उपस्थितांना स्वा. सावरकरांची देशभक्तीची शपथ दिली. पत्रकार
महेश खिस्ते यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी सदर ठिकाणी राष्ट्रीय विचारांचे ग्रंथप्रदर्शन व
सावरकर चरित्र चित्रमय प्रदर्शन लावण्यात आले. दर्शनार्थींची मोठ्या प्रमाणात भीड जमली होती.
त्यानंतर स्वा. सावरकरांचे तेजस्वी विचार, सावरकर विचारांचे अभ्यासक मोहन भालेराव यांनी
मांडले तर त्यानंतर सनातन संस्थेचे राजनजी बुणगे काका यांनी सावरकरांच्या कष्टप्रद जीवनातून
आपण घेणेचा बोध या विषयावर मार्गदर्शन केले. रा. स्व. संघाचे श्री दंडे सर, खंदाडे वैद्य आदी
बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. ग्राहक पंचायतीचे श्री. दिपक इरकल सर यांनीही या प्रसंगी
सावरकर जीवनावर प्रकाश टाकला. या प्रसंगी ग्राहक पंचायतीचे शशिकांत हरिदास, दत्तासिंह रजपूत
आदी अनेक मंडळी उपस्थित होती.
सातत्याने संपूर्ण दिवसभर विविध पक्ष संघटनेचे मान्यवर उपस्थित रहात होते. त्यांचे स्वागत
शहर हिंदुसभा अध्यक्ष स्वतः जातीने बाळासो डिंगरे करीत होते. चंद्रभागा साखर कारखान्याचे
चेअरमन कल्याणराव काळे, तसेच अ‍ॅड. राजेंद्र भादुले व बरीच मान्यवर मंडळींनी पुतळा पुजन केले.
सा. पंढरीवार्ताचे संपादक राजकुमार शहापूरकर यांनीही आपल्या भाषणात सावरकर चरित्राचा बोध
सांगितला. प्रकांड पंडित व थोर वे.शा.सं. श्री. तुकारामजी चिंचणीकर यांचे ही सावरकर जीवनावर
प्रदीर्घ व्याख्यान झाले. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे सर्व
पदाधिकारी मंडळी येवून स्वा. सावरकर पुतळ्यास अभिवादन केले. बाबासाो चव्हाण, बाबा
लगजकर, सोनके सरपंच तानाजी बोकणे व अध्यक्ष सिताराम कोळेकर, संतोष बंडगर तसेच श्री विठ्ठल
स.सा. कारखानाचे संचालक श्री. बाबासाो गडदे पाटील यांचा ही या मंडळात सहभाग होता. सर्वांनी
अहिल्यादेवी व सावरकर यांचे कार्य एकाच विचाराचे होते या विषयी मार्गदर्शन केले. सकाळच्या
सत्राचा समारोप जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. विजयकुमार देशमुखसाो व आ. प्रशांतराव परिचारक
यांनी स्वतः समक्ष येवून पुतळ्याचे पुजन केले. या दोघांचाही सत्कार शहर हिंदू सभा अध्यक्ष श्री.
बाळासाो डिंगरे व विवके बेणारे यांनी केला.
संपूर्ण दिवसभर आलेल्या मान्यवरांना सावरकर विचारांच्या पुस्तिका सप्रेम भेट देवून
गौरवण्यात येत होते. या ठिकाणी हार, नारळ ऐवजी पुस्तकांना महत्व देण्यात येत होते. तसेच प्रचंड
उकाड्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर हिंदूसभेतर्फे सर्वांना थंडगार लिंबूसरबत देवून स्वागत करणेत येत होते.
सायं. 5 वाजले पासून पुन्हा दर्शनार्थींचा ओघ सुरू झाला. पत्रकार नंदकुमार देशपांडे,
उद्योजक नानासे दोमकुंडवार, पत्रकार सुनिल उत्पात, अभय जोशी आदि मान्यवरांनी पुतळा पुजन
केले. त्याचबरोबर उद्योजक अरविंद लिमये, गुंतवणुक सल्लागार शशिकांत आयाचित, विठ्ठलराव
बडवे आदींनी पुतळा पुजन केलेृ.
स्वा. सावरकर बॉक्सिंग क्लबचे प्रमुख श्री. कैवल्य उत्पात व त्यांचे खेळाडू यांनी मुष्ठीयुद्धाची
चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यांना उपस्थित जनसमुदायाकडून मोठी वाहवा मिळाली.
यात काही बॉक्सर युवती व लहान मुलेपण होती. राष्ट्ररक्षणासाठी मजबुत युवक या सावरकरी
बाण्याप्रमाणे आम्ही खेळाडू घडवितो असे श्री. कैवल्य उत्पात यांनी या प्रसंगी सांगितले. या
खेळाडूंचा सत्कार या प्रसंगी शिवसेनेचे नेते व शिक्षण महर्षी श्री. बी. पी. रोंगे सर तसेच मनसेचे
जिल्हा संघटक श्री दिलीप धोत्रे तसेच भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री. बाबासाो बडवे यांचे हस्ते
संपन्न झाला. या सर्वांनी आपल्या भाषणात सावरकर जीवनाचा गौरव केला.
यानंतर पुतळ्यापाशी संपूर्ण गावातून फेरी काढून आलेली मोटारसायकल रॅली विसावली.
हलग्यांच्या कडकडाटात व उंच भगवे झेंडे फडकावत शेकडो युवक विठ्ठल मंदिरापासून निघून गावात
फिरून गगनभेदी घोषणा देत सावरकरांना वंदन करणेसाठी पुतळ्यापाशी आले. सर्वाचे पुतळापुजन व
त्यांचा सत्कार करणेत आला. मा. नगरसेवक ॠषिकेश उत्पात, श्री गणेश महाजन बडवे, श्री. भागवत
महाजन बडवे, श्रीकांत हरिदास, शाम हिवरकर, आदी मंडळी तसेच छावा युवक संघटनेचे मावळे या
रॅलीत अग्रभागी होते.
पंढरपूर माहिती संघाचे श्री नरेंद्र कवडे व श्री कर्नाटक मठाचे ह. भ. प. शिऊरकर महाराज
तसेच ह.भ.प. श्री शिरवळकर महाराज आदी संतांनी स्वा. सावरकर पुतळा पुजन केले. पत्रकार श्रीराम
साळुंखे तसेच उद्योजक हिंदू सभा जेष्ठ नेते पंडित भोले पुणेकर यांनीही पुतळा पुजन केले.
समाजसुधारक अ‍ॅड. अखिलेश वेळापुरे यांनीही पुतळापुजन केले.
ज्ञानप्रसाद अकादमीचे संचालक श्री. व्ही. डी. परिचारक यांनी शेवटचे पुतळापुजन रात्रौ 9.15
वा. केले. त्यावेळी श्री दिनेश भट्टड, श्री. बामणेसर, आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण दिवसभर आलेल्या मंडळींचे स्वागत करणेसाठी शहर हिंदू सभा अध्यक्ष बाळासाो डिंगरे,
प्रशांत खंडागळे, दिपक कुलकर्णी, दत्ताजीराव शिंदे, सचिन व्यवहारे, श्री. बाबाराव महाजन, विकास
मोरे, श्री. कासेगांवकर, अनिकेत बडवे, दिनेश सुगंधी यांनी परिश्रम घेतले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *