हृतिक रोशनने लाँच केला
‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर!
हृतिकने ह्या सिनेमाच्या रिलीजची तारीखही ट्विटरव्दारे जाहिर केली होती. आणि आता रविवारी मुंबईमध्य़े झालेल्या दिमाखदार सोहळ्याला स्वखुशीने हजेरी लावून हृतिकने ह्या सोहळ्याची शान वाढवली. आणि ट्रेलर लाँच केला.
‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर!
अनिल चौधरी : पुणे :-
‘हृदयांतर’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या सुपरस्टार हृतिक रोशनने नुकताच ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. ‘हदयांतर’ सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल ठेवतोय. त्यामुळे आपल्या मित्राच्या सिनेमात काम करताना हृतिक रोशन खूप खुश आहे.
सुपरस्टार हृतिक रोशन आणि विक्रम फडणीस ह्यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि त्या मैत्रीखातरच हृतिक पहिल्यांदाच एका मराठी चित्रपट सोहळ्यात दिसला
यावेळी हृतिक रोशन म्हणाला, “ही फिल्म जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हा मी दूस-या एका प्रोजेक्टवर काम करत होतो. पण विक्रमने जेव्हा मला चित्रपटाचा विषय ऐकवला. तेव्हा त्या दूस-या कामातून माझं लक्ष ह्या फिल्मकडे वेधलं गेलं. विक्रमचा सिनेमाविषयी असलेला असामान्य दृष्टीकोण, त्याविषयी असलेलं सखोल ज्ञान आणि आवड ह्यामुळेच ही सुंदर फिल्म आकाराला आली आहे. हा हृदयांतर चित्रपट विक्रमचं हृदय आहे. आणि ह्या चित्रपटाव्दारे मला उत्म कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाल्याबद्दल मी विक्रमचा आभारी आहे.“
निर्माता पुर्वेश सरनाईक म्हणतो, “विक्रमने जेव्हा मला ह्या चित्रपटाचे नाव सांगितले. त्यानंतर मी सिनेमाची स्क्रिप्टही ऐकली नाही. कारण ह्या फिल्मचे नावचं एवढे भारदस्त आणि अर्थपूर्ण आहे. मला अतिशय आनंद होतोय, की, हृतिक रोशन आणि श्यामक डावर सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम सेलिब्रिटी आमच्या ह्या सिनेमात आहेत. “
विक्रम फडणीस म्हणतो, “हृतिक रोशन ह्या सिनेमाचा हिस्सा असणं, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हृतिक नेहमीच ह्या ना त्या प्रकाराने हृदयांतरच्या पाठीशी उभा राहिलाय. त्यामुळेच हृतिकच्या हस्ते हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणं ही आमच्या संपूर्ण हृदयांतरच्या टीमसाठी खुप महत्वाची गोष्ट आहे. हा आमच्यासाठी नेहमीच एक स्पेशल दिवस असणार आहे.”
गुलशन कुमार प्रस्तुत, यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या, आणि टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेल्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटा त मुक्ता बर्वे,सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 7 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होतोय.






