👁 10 Views

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट ‘रिंगण’ 30 जून ला होणार प्रदर्शित

निर्मात्या विधि कासलीवाल करणार हा चित्रपट प्रदर्शित

अनिल चौधरी : पुणे :- 
वितरक  मिळाल्याने काही आशयघन सिनेमांपासून प्रेक्षकांना वंचित रहावंलागत आहेया यादीतील काही नावं म्हणजे ‘कासव‘, ‘दशक्रिया‘, ‘हलाल‘… याचयादीत काही दिवसांपूर्वी अजून एक नाव होतं ‘रिंगण‘… मात्र या दुष्टचक्रातूनरिंगण‘ चित्रपटाची मुक्तता झाली आहे.
सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बापलेकाचा प्रवास या चित्रपटातदाखवण्यात आला आहेया चित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहोरउमटवलीसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात 63 वा राष्ट्रीय पुरस्कारावर रिंगणआपली मोहोर उमटवली त्याबरोबरच 53व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय पुरस्कारांतसर्वोत्कृष्ट चित्रपटसर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्टअभिनेतासर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शनसर्वोत्कृष्ट बालकलाकर या पुरस्करांवरआपले नाव कोरलेत्याशिवाय कान्सस्टट्टगर्ट (जर्मन), लंडनटोरांटो या काहीमानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपलं वेगळेपण दाखवून दिलं.
या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारारिंगण अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहेआपली निर्मिती प्रेक्षकांसाठीमनोरंजनाबरोबर बोधपूर्णही असावी या विचारांच्या विधि कासलीवाल यांनीप्रेक्षकांमध्ये जगण्याची नवी उमेद जागवणारामकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगणप्रेक्षकांना प्रेझेंट करायचे ठरवले आहेलॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोलमोशन पिक्चर्स निर्मित ‘रिंगण‘ 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *