👁 11 Views

बाबरी प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतींवर आज आरोप निश्चिती?

लखनऊ – 

अयोध्येतील बाबरी मशिद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयात मंगळवारी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा आणि विष्णु हरी दालमिया यांच्यासह 13 नेत्यांविरोधात आरोप निश्चित केले जाणार आहे. यांच्यावर बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याचे षडयंत्र रचण्याचा आरोप आहे. कोर्टाने सुनावणी दरम्यान सर्वांना हजर राहाण्याचे आदेश दिले आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी दिल्लीहून लखनऊसाठी रवाना झाले आहे.25 मे रोजीच्या सुनावणीत काय झाले…– सीबीआयच्या स्पेशल कोर्टात बाबरी प्रकरणासंबंधी दोन वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी सुरु आहे.– मशिद पाडण्याच्या प्रकरणाची सुनावणी 25 मे रोजी झाली होती. यात महंत नृत्य गोपाल दास, महंत राम विलास वेदांती, वैकुंठलाल शर्मा उर्फ प्रेमजी, चंपत रॉय बंसल, धर्मदास आणि डॉ. सतीश प्रधान यांच्यावर आरोप निश्चित झाले नाही. कोर्टाने या सर्वांना सुनावणीला हजर राहाणयाचे सांगितले होते, मात्र यापैकी फक्त सतीश प्रधान 25 मेच्या सुनावणीला कोर्टात हजर होते.– त्यावेळी कोर्टाने म्हटले होते की 30 मेच्या सुनावणीवेळी या आरोपींकडून कोर्टात हजर न राहाण्यासाठी कोणतीही सूट मिळणार नाही किंवा तशा कोणताही अर्ज मंजूर केला जाणार नाही.काय आहे पूर्ण प्रकरण– डिसेंबर 1992 ला दोन एफआयआर दाखल झाले होते. एक अज्ञात कारसेवकांविरोधात होता. यात मशिद पाडण्याचा आरोप केला गेला होता. याची सुनावणी लखनऊ कोर्टात झाली होती. तर, दुसरा एफआयआर अडवाणी, जोशी आणि इतरांविरोधात होता. या सर्वांवर मशिदीचा ढांचा पाडण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप होता. या नेत्यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप होता. या केसची सुनावणी रायबरेली कोर्टात सुरु होती.– मागील सुनावणीत सीबीआयने सुप्रीम कोर्टाला म्हटले होते, की लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह 13 जणांविरोधात गुन्हेगारी षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. त्या अनुषंगाने खटला चालला पाहिजे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *