👁 12 Views

श्री संत भिमा भोई यांची 167 वी जयंती साजरी … भोई समाज क्रांतीदल संघटनेचा उपक्रम

पंढरपूर शहर व तालुका भोई समाज क्रांतीदल संघटनेच्या वतीने येथील भोईराज मठात संत भिमा भोई यांची 167 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पुजन पंढरपूर शहर उपाध्यक्ष तुषार शिंदे व शुभांगी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोई समाज क्रांतीदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर शेवाळे हे होते.या निमित्ताने येथील नवरंगे बालकाश्रमात संघटनेच्या वतीने बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.                 यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर शेवाळे म्हणाले की,आजपर्यंत आपला समाज संघटीत नव्हता.आपल्या समाजाचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.विविध शासकिय योजना असोत अथवा इतर लाभ असोत समाजाने संघटीतपणे प्रयत्न केल्यास समाजाची निश्‍चिीत प्रगती होऊ शकते.संत भिमा भोई यांनी आपल्या भक्ती आणि त्यागाने समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे.त्यांच्या शिकवणीनुसार वाटचाल केल्यास आपली ऐहिक आणि परमार्थिक उन्नती होणार आहे.             यावेळी किसन तमखाने,विजय नेमाडे,हनुमंत तमखाने,संजय नेमाडे,रुपाली गवळी,सरस्वती तमखाने,शिला नेमाडे,अरुणा नेमाडे,लता नेमाडे,सुनिता सिध्दनाथ,सुरेखा तमखाने,भारती नेमाडे,बेबी तमखाने,माधुरी तमखाने यांच्यासह बालकाश्रमाच्या अधिक्षीका आर.आर.गाडे,कार्यकारी अधिकारी व्हि.जी.दर्शने,धर्मराज डफळे,दिपक पांढरे,लक्ष्मी नांदरे,दिपा दर्शने यासह संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *