👁 9 Views

बारावीचा निकाल आज

दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल
पुणे, (प्रतिनिधी)- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (30 मे) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये बारावीच्या निकालाबाबत तारखा फिरत होत्या. मात्र याला आता पूर्णविराम मिळाला असून राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात 15 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना तो करता येणार आहे. त्यासाठी अर्जाचा आवश्‍यक नमुना संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो डाऊनलोड करुन स्वयंसाक्षांकित गुणपत्रिकेच्या प्रतिसह विद्यार्थ्यांनी 31 मे ते 9 जून या कालावधीत तो अर्ज व शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे सादर करायचा आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी आधी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्‍यक आहे असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
 निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
http://jagranjosh.com/results
http://htcampus.com/results
बारावीची पुरवणी परीक्षा 11 जुलैपासून
इयत्ता बारावीची ऑक्‍टोबर महिन्याऐवजी जुलै महिन्यात घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा 11 जुलै पासून घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य बोर्डाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली. जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत अनुतीर्ण होतील त्यांना या माध्यमातून पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार असून यासाठीचे ऑनलाईन अर्ज 5 जून पासून भरण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *