👁 12 Views

संमोहनाबाबत समज-गैरसमज

संमोहनाबाबत समाज-गैरसमज 

(१)   संमोहनतज्ञ संमोहित व्यक्तीला संमोहित  करून सोडून गेला तर काय होते ? याची भिती वाटते  ?

उत्तर : ती व्यक्ती संमोहन अवस्थेतून नैसर्गिक झोपेत जाते. ( २ तास, ८  तास तिच्या झोपेवर अवलंबून )झोप झाल्यावर टी आपोआप जागी होते. त्यामुळे संमोहनाची भिती मनातून काढून टाका.संमोहन हि नैसर्गिक क्रिया आहे.

(२)   काही व्यक्ती म्हणतात संमोहन झालेच नाही ?

उत्तर : संमोहनाच्या तीन अवस्थांमुळे  असे वाटते. पहिल्या अवस्थेत सर्व काही समजते. मध्यम अवस्थेत थोडे  थोडे समजते. गाढ अवस्थेत काहीच समजत नाही.
कधीकधी  संमोहनातून जागे केल्यावर मित्र कंपनी म्हणते तू असे केले तू तसे केले. त्यामुळेसुद्धा संमोहनात मला सारे समजत होते, मी संमोहनात गेलोच नाही असे वाटते.

(३)    संमोहनामध्ये  गुपिते काढली जातात काय ?

उत्तर : उपचारासाठी अंतर्मनातील काही बाबी समजून घेतल्या जातात. आपल्याला अपाय होईल अशी काहीही गुपिते व्यक्ती सांगत नाही; किंवा काढण्याची गरज नाही.

(४)   भारतात  असे प्रयोग केले जातात का ?

उत्तर : संमोहन ( हिप्नोटीझम )  या शास्त्राची सुरुवात मुळात पश्यात्य देशांतून  झाली. अमेरिका, ब्राझील, जर्मनी, जपान, इंग्लंड, चीन अशा सर्वच देशांत  संमोहन शास्त्राचा फायदा  कोट्यावधी लोक करून घेत  आहेत. आपल्याकडे हल्ली संमोहनउपचारांकडे लोक जास्त प्रमाणात आकर्षित होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची (W.H.O.) जगभरात संमोहन उपचारासाठी मान्यता आहे.

(५)  एकदा संमोहनउपचार केल्यावर पुन्हा उपचार घेण्याची गरज आहे का ?

उत्तर : घरच्याघरी दिलेल्या सूचना, सी.डी. कॅसेटमुळे तुम्ही स्वतःच स्वसंमोहनामध्ये जात असता म्हणजे घरीच उपचार करू शकता. काही तीव्र स्वरूपाच्या आजारांत मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन संमोहनउपचार  सुरु ठेवावेत.

(६)  संमोहन उपचारांचा फायदा सर्वांनाच कसा होतो ?

उत्तर : संमोहन हे मनाचे शास्त्र आहे. शरीराला जसे आजार होतात तसे मनालाही होतात. त्यामुळे संमोहनामुळे  मनाचे कार्य समजते. भविष्यात मन कणखर राहण्यासाठी, मनाचे आजार होऊ नये यासाठी संमोहन उपचारांचा फायदा सर्वांनाच होतो.

संमोहन उपचार तज्ञ

जोतीराम दिघे. 

 9403739912

क्रमशः..

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R 

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58, 
पार्क स्टेडियम, 
सोलापूर. 
मो.९८९०१९५०५९

एक्यूयोगा क्रमशः

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *