एक्यूयोगा क्रमशः
१) मोठ्या आतड्याच्या ऊर्जाप्रवाहासाठी एक्यूयोगा
१. दोन्ही पायात अंतर घेऊन उभे राहावे. पायाचे अंगठे आयातील बाजूस थोडेसे सरकवून घ्यावे. म्हणजे दोन्ही पायाचे अंगठे आणि टाचा समांतर रेषेत येतील.
२.दोन्ही गुढघे थोडेसे वाकवून पाठ कंबर सरळ ठेवून खाली सरकावे.
३. दावा पाय बोटाकडून बाहेर सरकवा.
४. डाव्या हातात धनुष्य आहे अशी कल्पना करून दावा हात डाव्या बाजूस खांद्याच्या रेषेत करावा.
डाव्या हाताची तर्जनी वर करावी.
५. डावीकडे बघून उजवा हात डाव्या हातातील धनुष्याची दोरी पकडल्याप्रमाणे डावीकडे घ्यावा.
६. श्वास घेत उजवा हात धनुष्याची दोरी शक्तिपूर्वक ताणात डाव्या खांद्याच्या रेषेत उजव्या खांद्यापर्यंत ओढावा.
७. श्वास सोडतात पुनः उजवा हात डाव्या हाताकडे समांतर रेषेत न्यावा.
हि क्रिया १ ते २ मिनिटे सावकाश क्षमतेनुसार करावी. नंतर हीच क्रिया उजव्या हातात धनुष्य आहे असे कल्पून ३ ह्या वाक्यामध्ये उजवा पाय बोटाकडून बाहेर सरकवून करावी…

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R





