ठाणे : प्रतिनिधी
विनयभंग किंवा महिलांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी एकीकडे सर्वच स्तरातून प्रोत्साहन मिळत असताना, दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार करायला गेलेल्या ठाण्यातील महिलेला मात्र या व्यवस्थेचाच अतिशय वाईट अनुभव आला आहे. अंघोळ करताना लपून चित्रीकरण करणार्याविरोधात कापूरबावडी पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलेल्या एका विवाहितेने अंघोळ करतानाचे चित्रीकरण पुरावा म्हणून पोलिसांना दाखवले. त्यावेळी हा व्हिडीओ केवळ एका पोलिसाने न बघता एकामागून एक पोलीस हा व्हिडीओ पाहत होते.
विनयभंग एकदा झाला. मात्र पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी हा व्हिडीओ बघून दहा वेळा विनयभंग केला असल्याची भावना या महिलेच्या मनात निर्माण झाली आहे. या वाईट व्यवस्थेच्या विरोधात आता या महिलेने लढा देण्याची तयारी केली असून त्यांना महापौर मीनाक्षी शिंदे यांची साथ मिळाली आहे. शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांनाच पत्र लिहिले असून या पत्रामध्ये महिलांची तक्रार महिला पोलिसांनीच घ्यावी तसेच महिलांना तक्रार करण्यासाठी वेगळ्या कक्षाची मागणी त्यांनी केली आहे.
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होत नसून अजूनही काही महिला तक्रार करायला पुढे येत नाहीत. या सर्व गोष्टींना व्यवस्थाच जबाबदार असून मानपाड्यात राहणारी एक महिला या व्यवस्थेचा बळी पडली आहे. दहा दिवसांपूर्वी घरात अंघोळ करताना एका व्यक्तीने त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. आपले चित्रीकरण होत असल्याचे या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने या व्यक्तीला पकडून त्याचा मोबाईल घेतला. त्यानंतर कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार करायला गेल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव आला. अंघोळ करतानाचे चित्रीकरण पुरावा म्हणून पोलिसांना दाखवताना पोलीस स्टेशनमधील पुरुष पोलीस हा व्हिडीओ ज्या पद्धतीने बघत होते त्यामुळे या महिलेच्याच मनात लज्जा निर्माण झाली. एका पोलिसाने हा व्हिडीओ बघणे पुरेसे झाले नाही म्हणून एकामागून एक पोलीस हा व्हिडीओ बघत असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. विनयभंग एकदा झाला. मात्र पोलीस स्टेशनमध्ये दहा वेळा विनयभंग झाला असल्याची भावना या महिलेच्या मनात निर्माण झाली असून आता या व्यवस्थेच्या विरोधात तिच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे .
आपल्याबरोबर पोलीस स्टेशनला झालेली हकीकत त्यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांना सांगितली. झालेला प्रकार ऐकून त्या देखील सुन्न झाल्या. शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पत्र लिहून ही व्यवस्थाच बदलण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्या स्वतः पोलीस आयुक्तांची भेट देखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पीडित महिलेने देखील हा व्यवस्थेविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निश्चय केला आहे. ही व्यवस्था बदलली नाही तर महिला अजूनही तक्रार करायला पुढे येणार नाहीत अशी भीती या महिलेने व्यक्त केली आहे. या सर्व प्रकाराबाबत पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात याकडे आता या महिलेचे लक्ष लागले आहे .