ट्विटरने गायक अभिजित भट्टाचार्य याची पुन्हा एकदा हकालपट्टी केली. अभिजितचे काही दिवसांपूर्वी ट्विटरने अकाउंट बंद केले होते. त्यानंतर त्यांनी नवे अकाउंट सुरु केले होते.
अभिजीत यांनी @singerabhijeet हे नवे अकाउंट सुरु करुन पुन्हा एकदा सोशल मीडियात प्रवेश केला होता. मात्र ट्विटरने पुन्हा एकदा त्यांचे अकाउंट बंद केले.
अभिजीत यांनी @singerabhijeet हे नवे अकाउंट सुरु करुन पुन्हा एकदा सोशल मीडियात प्रवेश केला होता. मात्र ट्विटरने पुन्हा एकदा त्यांचे अकाउंट बंद केले.
New Account…Wait.. Suspended Again😂#AbhijeetBhattacharya#ABHIJEETisBack but gone with the winds 😉 pic.twitter.com/dxl3n0IqOl— Saniya Sayed (@Ssaniya25) May 29, 2017
महिलांवर आक्षेपार्ह विधान केल्यावरून ट्विटर इंडियाने अभिजीत यांचे अकाउंट बंद केले होते. अभिजीत यांना समर्थन देण्यासाठी गायक सोनू निगमने स्वतःहून ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला होता.
नव्या ट्विटर अकाउंटवर अभिजीत यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ‘जे देशाच्या आणि भारतीय लष्कराच्या विरोधात आहेत, मी त्याच्याविरुद्ध बोलणारच’, असे अभिजीतने व्हिडिओत म्हटले होते. तसेच जोपर्यंत माझे व्हेरिफाय अकाउंट पुन्हा सुरु होत नाही तोपर्यंत तुम्ही मला याच अकाउंटवर फॉलो करा. माझ्या नावाचे बाकी सर्व अकाउंट फेक आहेत, असे त्यांनी म्हटले होते.




