👁 11 Views

महावितरणच्या तक्रार निवारण केंद्राविरोधातच नगरसेवक विक्रम शिरसट यांची तक्रार

शहराच्या मध्यवर्ती भागात व उपनगरात तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याची मागणी

पंढरपूर शहराची लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता पंढरपूर शहराची जबाबबदारी असलेल्या महावितरण कार्यालयातील तक्रार निवारण केंद्र म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असून या ठिकाणचा फोन कायम व्यस्त तरी लागत असतो अथवा लागला तर उचलला जात नाही.त्यामुळे अचानक दुर्घटना घडल्यास अथवा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास चौकशी अथवा तक्रार करण्यासाठी नागरिकांना थेट महावितरणचे पद्मावती येथील कार्यालय गाठावे लागते.त्यामुळे महाविरतणने शहराचा विस्तार लक्षात घेता उपनगरात व शहराच्या मध्यवर्ती भागात तक्रार निवारण केंद्र सुरु करावे अशा आशयाचे निवेदन पंढरपूर नगर पालीका पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी महाविरतणचे अभियंता सोनंदकर यांना दिले आहे.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे,अनिकेत शिरसट,किशोर दंदाडे,पप्पू सुरवसे,शुभम कोळी,अमोल तारापूरकर,समाधान घंंटे,अमर घाटे,शिवाजी तारापूरकर आदी उपस्थित होते. 
      3 जुन रोजी पंढरपूरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला.वादळी वार्‍यामुळे शहरातील चंद्रभागेच्या वाळवंटासह आसपासच्या परिसरातील अनेक घरांचे व झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी पत्रे उडून गेल्याचे दिसून आले.या घटनेनंतर रात्री उशीरा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.परंतू अनेक ठिकाणी घराचे छपरे  उडून गेल्याने व वीज वाहक तारा तुटून पडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.यावेळी तातडीने विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी नुकसान ग्रस्त भागातील नागरिकंानी महावितरणच्या 223226 या लॅन्डलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळत नव्हता.महावितरणच्या तक्रार निवारण केंद्राबाबतच नागरिकांच्या तक्रारी आहेत.मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती.तांबेकर गल्ली येथे गॅस सिलेंरचा भडका उडून दोन घरांना आगीने वेढले असता  या भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी येेथील नागरिकांनी महावितरणच्या तक्रार निवारण केंद्राशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळत नव्हता.ही बाब अतिशय गंभीर आहे.
     यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला जातो.वास्तविक पाहता पंढरीत दरदिवशी  भाविकांची मोठी वर्दळ असून संभाव्य दुर्घटना लक्षात घेता महाविरणचे तक्रार निवारण केंद्र तत्पर राहणे गरजेचे आहे.परंतू त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे.तरी याबाबत महावितरणे तातडीने उपायोजना न केल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.    

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *