बिलोली बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे 2015 या वर्षे ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली सौ. साविञाबाई माधवराव घाटे या दोन प्रभागामधुन निवडुन आल्यामुळे त्यानी एका जागेचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 27 मे रोजी मतदान घेण्यात आले 29 मे रोजी मतमोजणी मध्ये सरपंच सुपुञ वैभव माधवराव घाटे हे बहुमताने विजय झाले. निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी हा निकाल जाहीर केला. बिलोली तालुक्यातील गंजगाव येथिल सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे 2015 च्या निवडणुकी मध्ये वार्ड क्र. 1 व वार्ड क्र.3 या दोनीही ठिकानाहुन बहुमताने विजय झाल्या होत्या . शासन नियमानुसार वार्ड क्रमांक तिनचा सदस्यचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेची शनिवारी 27 मे रोजी मतदान घेण्यात आले. 29 मे रोजी मतमोजणी घेण्यात आली. बिलोली तहसिलचे नायब तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी केलेल्या मतमोजणीत वैभव माधवराव घाटे यांना 216 मते तर गौराबाई गायकवाड यांना 91 मध्ये आणी दिलीप घाटे यांना 1 मत मिळाले आहे. तर नोटाला तिन मते मिळुन पञकार वैभव माधवराव घाटे यांनी बहुमताने विजय झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी वगवाड यांनी केली आहे.