आठवडा बाजारासह बाजारपेठ बंद ठेऊन केला शासनाचा निषेध
करकंब:-शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर फुकारलेल्या बंदला करकंबचा आठवडा बाजार बंद ठेऊन व व्यापऱ्यांनी बाजारपेठ कडकडित बंद ठेऊन बंदला पाठिंबा दर्शवुन शासनाचा निषेध केला आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहे त्यातूनच अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत येथून भविष्यात तरी असे प्रकार थांबावेत म्हणून मागील चार दिवसांपासून शेतकऱ्यांनीच एकी करून शेतीमालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे,शेतीमालावर घातलेले निर्बंध तत्काळ उठवावेत,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्यासाठी शेतकरी संघटनेसह सर्व शेतकऱ्यांनी 1 ते 10 जून या कालावधीत शेतीमध्ये पिकवलेल्या माल न विकण्याची वज्र्य मूठ बांधून आंदोलन पुकारले आहे याला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे.त्यातच आज संपूर्ण महाराष्ट्र बंदच्या दिलेल्या हाकेला पाठिंबा दर्शवत करकंब येथील शेतकरी,व्यापारी व ग्राहकांनी आठवडा बाजार पूर्ण बंद ठेऊन मुख्य बाजारपेठही दिवसभर बंद ठेवल्याने जनजीवन विसकळीत झाल्याचे दिसून येत आहे.
Posted inPandharpur Live News







