पुणे, दि. 6 – मुंबई-पुणे महामार्गावरील पेट्रोलच्या पाईपलाईनमधून कोट्यवधी रुपयांचे पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणात चार पोलिसांचाही समावेश आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत सहाय्यक निरीक्षक रवींद्र भिडे (पुणे शहर), उपनिरीक्षक एस. एस. ठोंबरे (पुणे ग्रामीण), पोलीस कर्मचारी इस्माईल पिरमोहम्मद शेख (चिंचवड पुणे), पोलीस शिपाई शिवशरण, मोतीराम शंकर पवार, दिनेश अनिल पवार अशा एकूण सहा जणांना अटक केले आहे.
इंधन चोरीचा गुन्हा उजेडात आल्यानंतर आरोपींना विमान नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीसच पेट्रोल चोरीच्या टोळीचे सदस्य असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
हा तपास उपायुक्त पंकड डहाणे व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता.





