👁 9 Views

खळबळजनक!! पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यासमोरच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यास मारहाण..!



पंढरपूर LIVE प्रतिनिधी  

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या समोरचच एका दूध संस्थेच्या चेअरमनने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यास जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे. 

या बाबत समजलेली माहिती अशी कि आज दिनांक ०६/०६/२०१७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे च्या समोर अजनसोंड ता. पंढरपूर येथील एका दूध संस्थेच्या चेअरमनने व अन्य काहिंनी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्यास दमदाटी करून मारहाण केल्याचे समजते. 

दूध संस्थेचे चेअरमन रोहन घाडगे व रमेश घाडगे आणि सुमित रोहन घाडगे यांनी हनुमंत बजरंग डुबल रा. अजनसोंड ता. पंढरपूर यांना दमदाटी करून मारहाण केली असल्याची माहिती मिळते..

सदर जखमी कार्यकर्त्यास उपचारासाठी जनकल्याण हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम चालू आहे.

या संदर्भात पंढरपूर Live शी बोलताना पंढरपूर शहर पोलिस ठाणेचे पोसई गोसावी म्हणाले की,
या मारहाणीत आंदोलनाचा काहीही संबंध नाही. गावातील दोन गटाचा वाद असुन शेतकरी संपाचा फायदा घेत वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होतोय. आमचा तपास सुरु आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *