👁 11 Views

‘तुमच्या मंत्रिमंडळात कुणी शेतकरी आहे का?’


 मुंबई
राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देऊन देवेंद्र फडणवीस सरकारला कोंडीत पकडणाऱ्या शिवसेनेनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे. ‘फक्त शेतकरी नेत्यांशीच चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका चांगली आहे. पण हे शेतकरी नेते कोण? तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय?’, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना हाणला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी शेतकरी संपाविषयी सरकारनं घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इतकंच नव्हे, उद्धव यांनी भाजपच्या कारभाराची तुलना याआधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कारभाराशी केली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *