पंढरपूर : प्रतिनिधी
विश्वभुषन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळयास नगरपालिकेकडून विलंब लावला जात असल्यामूळे पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे त्वरीत लोकार्पन करावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा नगरपालिकेने अद्याप ताब्यात घेतला नसून तो नियोजीत ठिकाणी पोहचविलेला नाही. पुतळा परिसरातील सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले नाही. अशा परिस्थितीत नगरपालिकेकडून दि.6 मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण साहेळा संपन्न करण्याचा आपला मानस असल्याची माहिती कळविले आहे. परंतू नगरपालिकेने अद्याप डॉ. आंबेडकर यांचा पुतळा आपल्या ताब्यात घेतला नसून तो नियोजीत ठिकाणी पोहचविलेला नाही. असे असताना नगरपालिकेकडून मान्यवरांना निमंत्रित केले जात आहे. त्यामुळे नगरपालिकेकडून मंत्री महोदयांची व जनतेची दिशाभूल केली जात आहे. पुतळा अनावरणासाठी दि.13 एप्रिल पासून अद्यापपर्यंत संबंधीत मान्यवरांच्या तारखांसाठी नगरपालिकेकडून कोणताही पाठपुरावा झालेला नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा नियोजित स्मारकास्थळी तांत्रिकदृष्टया योग्य पद्धतीने ताबडतोब जोडून घ्यावा अन्यथा नगरपालिकेसमोर दि. 4 जुलै पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पीपल्स रिपब्लीकन पार्टीच्यावतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




