पंढरपूर दि. 19 :- तालुक्यातील पात्र सर्व खातेदार शेतक-यांना कर्ज मिळण्यासाठी सुलभ पीक कर्ज अभियान राबविले जाणार आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामीन भागात शेतक-यांसाठी पीक कर्ज वाटप व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक निबंधक पी.टी.घुगे यांनी दिली.
तालुकास्तरावर शेतक-यांसाठी पीक कर्ज वाटप व मार्गदर्शन मेळावा दिनांक 21 जून ते 13 जुलै 2017 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. त्यानुसार सकाळी 11.00 वाजता दिनांक 21 जुन रोजी कनकंबा देवी मंदीर, करकंब, दिनांक 22 जुन रोजी हनुमान मंदीर, सोनके, दिनांक 23 जुन रोजी हनुमान मंदीर, सुस्ते, दिनांक 27 जुन यशवंत सभागृह, भोसे, दिनांक 28 जुन रोजी ग्रामपंचायत सभागृह, रोपळे, दिनांक 29 जून रोजी भाळवणी वि.का.संस्था , दिनांक 30 जुन रोजी राजलक्ष्मी कॉम्पलेक्स, खर्डी, दिनांक 10 जुलै रोजी ग्रामपंचायत सभागृह भंडीशेगांव, दिनांक 11 जुलै रोजी सांस्कृतीक भवन पट.कुरोली, दिनांक 12 जुलै रोजी चळे वि.का.कार्यालय चळे तसेच दिनांक 13 जुलै रोजी शेतकरी सभागृह, पंचायत समिती पंढरपूर येथे घेण्यात येणार आहे.
या मेळाव्यास बँकेचे अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहाय्यक, गटसचिव , सहकार विभागाचे अधिकारी, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कर्ज वाटपासाठी येणा-या अडचणी बाबत मार्गदर्शन तसेच तात्काळ कार्यवाही मेळाव्यात करण्यात येणार आहे. ज्या पात्र शेतक-यांना अध्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळाले नाही अशा शेतक-यांनी मेळाव्यास उपस्थित राहून कर्ज मागणी अर्ज सादर करावेत. पीक कर्ज मेळाव्यास येताना शेतक-यांनी 7/12 उतारा, 8अ,रहिवाशी पुरावा आणावा. त्यानुसार मेळाव्याच्या ठिकाणी कर्ज वाटपा विषयीच्या आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. तसेच या मेळाव्याचा जास्तीत-जास्त पात्र शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही सहाय्यक निबंधक श्री घुगे यांनी केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




