👁 7 Views

नित्या आणि नायशाचा बाबांसोबत ‘फादर्स डे’

हृदयांतर
अनिल चौधरी:- पुणे :-
विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. ह्या ट्रेलरमधून चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा शेखर जोशी ह्यांच्याकडे कामाच्या व्यापामूळे आपल्या नित्या आणि नायशा ह्या दोन मुलींसाठी वेळच नसतो, हे समोर आलंय.
हृदयांतर सिनेमातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणा-या, आणि आपल्या करीयरच्या मागे धावताना कामाच्या व्यस्ततेमूळे आपल्या मुलांना व्यवस्थित वेळ न देऊ शकणा-या अनेक शेखर जोशींची ही कथा म्हणायला हवी.
ही भूमिका साकारणा-या अभिनेता सुबोध भावेशी ह्यासंदर्भात चर्चा केल्यावर त्याने सांगितले, काहीही म्हणा, पण ह्या सिनेमाच्या निमीत्ताने दोन गोड मुलींचा बाप बनण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. कोणीही पून्हा पून्हा त्यांच्या प्रेमात पडाव्यात अशा ह्या मुली आहेत. ह्या दोन्ही मुली जेवढ्या लाघवी आहेत, तेवढ्याच समंजसही आहेत. त्यामूळे ह्यांच्यासोबत काम करणं नक्कीच सुखावह होतं.
फादर्स डे निमीत्ताने सुबोधने नुकतीच त्याच्या दोन्ही ऑनस्क्रिन मुलींना ट्रीट दिली. त्यावेळीही दोन्ही मुलींची सुबोधशी असलेली बॉन्डिग दिसत होती.
यंगबेरी एन्टरटेन्मेटइम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि  टोएब एन्टरटेन्मेट निर्मित  ‘हृदयांत चित्रपट  जुलै २०१७  रोजी प्रदर्शित होणाऱ आहे.  या चित्रपटात मुक्ता बर्वेसुबोध भावेआणि सोनाली खरे मुख्य भूमिका आहेत.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *