👁 9 Views

संजय दत्त B’day Special : सेटवर कसा असायचा ‘संजूबाबा’, हिरोईन्सने सांगितल्या आठवणी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017


गेल्या 35 वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या संजय दत्तने आथापर्यंत सुमारे 150 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर, संजय दत्त सध्या पुनरागमनाच्या तयारीत आहे. आगामी काळात तो ‘भूमी’, ‘मलंग’, ‘साहेब बिबी और गँगस्टर 3’, ‘शिद्दत’ अशा चित्रपटांत तो झळकणार आहे.

आगामी काळात येणाऱ्या चित्रपटांत संजय दत्त आदिती राव हैदरी, सोनाक्षी, आलिया, अंकिता लोखंडे अशा नव्या हिरोईन्सबरोबर झळकणार आहे. पण यापूर्वी संजय दत्तने अेक हिरोईन्सबरोबर काम केले आहे. सध्या या हिरोईन्स फार मोजक्या प्रमाणात चित्रपट करत आहेत.

संजय दत्तच्या 58 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने काम केलेल्या हिरोईन्सकडून त्याच्याबरोबर काम करतानाचे अनुभव आणि किस्से जाणून
घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. काजोल, पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लन यांनी संजूबाबाबरोबरचे काही रंजक किस्से आम्हाला सांगितले आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, संजय दत्तबाबत त्याच्या हिरोईन्सने सांगितलेले किस्से..


काजोल – आईला (तनुजा) घाबरायचा संजूबाबा


1998 मधील दुश्मन चित्रपटात काजोलबरोबर संजयची जोडी पाहायला मिळाली होती. काजोलचा या चित्रपटात डबल रोल होता. दुश्मनच्या पूर्वी काजोल कधीही संजय दत्तला भेटली किंवा बोलली नव्हती. या चित्रपटाच्या वेळीच्या आठवणी सांगताना काजोल म्हणाली, त्यावेळी आई (तनुजा) अनेकदा माझ्याबरोबर सेटवर यायची, त्यामुळे संजय अस्वस्थ व्हायचा. तो तनु मा(संजय दत्त तनुजा यांना तनु मा म्हणायचा) मला काही बोलतील का याला भ्यायचा. त्यावेळी अनेकदा मला त्याला शांत करावे लागत होते. त्याचे लक्ष वळवण्यासाठ मग मी त्याच्याशी काहीवेळ इतर विषयांवर बोलायचे.


पूनम ढिल्लन – इतर कलाकारांच्या मदतीने उडवायचा खिल्ली


पूनम ढिल्लन आणि संजय दत्त यांनी नाम (1986), कुर्बानी रंग लायोगी (1991), महानता (1997), ये है जलवा (2002) असे चित्रपट केले. त्या सांगतात, मी तेरी कसमच्या सेटवर मनालीत संजय दत्तला सर्वप्रथम भेटले होते. तो रती बरोबर त्याच लोकेशनवर शूट करत होता. माझ्या चित्रपटाचा हिरो कुमार गौरव होता, ते दोघे मित्र असल्याने संजय दत्त त्याला भेटायला आला होता.

मी संजयबरोबर केलेला पहिला चित्रपट होता नाम. त्यावेळी तो पद्मिनी कोल्हापुरेच्या बरोबर मिळून मला वाईट वाटेल असे वागायचा. ते दोघे मराठीमध्ये बोलायचे. मला एकही शब्द कळत नव्हता, म्हणून मी शांत असायचे. ते गप्पा मारायचे, मजा करायचे पण मी एका कोपऱ्यात बसलेले असायचे. कदाचित ते माझी खिल्ली उडवत असतील. पण मी लाजाळू होते, त्यामुळे बाजुला बसलेले असायचे. ते मला रागीत समजायचे.


पद्मिनी कोल्हापुरे – तू तू मै मै


त्या काळात अॅक्टर्सना व्हॅनिटी व्हॅन नसायच्या. त्यामुळे कलाकारांमध्ये गट्टी जमायची. सेटवर गप्पा मारायचे, गाणे ऐकायचे पार्टी प्लान करायचे. सेटवर आम्ही सापसिडीसारखे खेळ खेळायचो असे पद्मिनी सांगतात. दोघांनी विधाता (1982), बेकरार (1983), दो दिलो की दास्तान (1985), कुर्बानी रंग लायेगी (1991) असे चित्रपट केले.


एक किस्सा सांगताना पद्मिनी म्हणाल्या, त्याकाळी मोबाईल नव्हते. हॉटेलमधून फोन करावे लागायचे. बजेटची काळजी असणारे काही निर्माते ऑपरेटरला फोन लावून देऊ नका असे सांगायचे. त्यावर संजू चिडला आणि निर्मात्याशी बोलणार असे म्हणाला. एका रात्री निर्माता येत होता, तेव्हा संजू त्याच्याकडे गेला आणि बोलण्याऐवजी पळून आला. मला म्हणाला तूच त्याच्याशी बोल. एढे सांगून तो गायब झाला, मला काय करावे तेच कळत नव्हते.

पद्मिनी कोल्हापुरे – रिटर्न गिफ्ट


पद्मिनी सांगतात, एका दिवशी संजय माझ्याकडे आला आणि मला एक गिफ्ट दिले. ते नेमके काय होते हे आठवत नाही, पण मला चांगले वाटले. मी त्यावेळी कुमार गौरवबरोबर चित्रपट शूट करत होते. मी त्याला संजयने दिलेले गिफ्ट दाखवले. कुमारला धक्काच बसला. कारण ते गिफ्ट कुमारने संजयला दिले होते, आणि जपून ठेवायला सांगितले होते.


रती अग्निहोत्रीने संजय दत्तबरोबर जॉनी आय लव्ह यू (1982), मै आवारा हू (1983), मेरा फैसला (1984) हे चित्रपट केलेल आहेत.


अनिता राज आणि संजय दत्त यांनी जमीन आसमान (1984), जान की बाजी (1985) हे चित्रपट केले आहेत.


अमृता सिंगबरोबर संजय दत्त


ने नाम 1986, नामो निशान 1987, जीते है शान से (1988) या चित्रपटांत काम केले आहे.






पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *