👁 7 Views

‘नवनीत’ च्या मालकांचे अपहरण करून खून, 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी झाले होते अपहरण

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017

‘नवनीत’ च्या मालकांचे अपहरण करून खून, 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी झाले होते अपहरण
अहमदाबाद – प्रसिद्ध नवनीत प्रकाशन या बड्या प्रकाशन संस्थेचे मालक नवीन शहा (७१) यांचा खून करण्यात आल्याची घटना घडली. मंगळवारपासून ते बेपत्ता झालेले होते. शुक्रवारी त्यांचा मृतदेह गुजरातेतील मालपूर येथे आढळला.
या प्रकाशन संस्थेतील माजी कर्मचारी जिग्नेश भावसार हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह चार आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. नवीनभाई यांना एकच किडनी होती. एक किडनी त्यांनी पत्नीला दान केली होती. आरोपींनी ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन शहा अहमदाबादेत राहत होते. २५ जुलै रोजी घरातून प्रिंटिंग प्रेसला जाण्यासाठी बाहेर पडले होते. ड्रायव्हर कार चालवत होता. वाटेत त्यांनी कार थांबवली आणि एका रेस्टाॅरंटमध्ये गेले. तेथून ते बाहेर पडलेच नाहीत. नंतर तेथून हरवल्याची तक्रार त्यांच्या चालकाने पोलिस ठाण्यात दिली. गुरुवारी रात्री अरवल्ली जिल्ह्यातील गाजणगावात एक मृतदेह सापडल्याची माहिती सरपंचाने पोलिसांना दिली. मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यांच्या नातेवाइकांनी मृतदेह नवीन शहा यांचाच असल्याचे ओळखले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून चार लोकांना अटक केली आहे. नवनीत प्रकाशन देशातील मोठी प्रकाशन संस्था अाहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  






Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *