पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 29 July 2017
पिकविम्यासाठी बँकेत खेटे घालणा-या शेतकऱ्याचा करुण अंत…
बीड – पिकाविमा काढण्यासाठी बॅंकेत खेटा मारणाऱ्या शेतकऱ्याचा दुचाकीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तालुक्यातील उजनी पाटीजवळ शनिवारी सकाळी 8 वाजता घडली. मंचक इंगळे (वय 50, रा. जोडवाडी ता. अंबाजोगाई) असे मृत्यूमुखी शेतकऱ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, मंचक इंगळे हे मागील तीन दिवसापासून पीकविमा भरण्यासाठी घटनांदूर येथे चकरा मारत होते. परंतु, वेबसाईट खूपच संथ गतीने चालत असल्याने त्यांना विमा भरणे शक्य झाले नव्हते. त्यासाठी त्यांनी दोन रात्रीसुद्धा जागून काढल्या, परंतु उपयोग झाला नाही.
शनिवारी सकाळी ते मुलगा शिवराज याच्यासोबत पीकविमा भरण्यासाठी पुन्हा घाटनांदूरकडे निघाले होते.
धावत्या दुचाकीवरून कोसळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पीकविमा काढण्यासाठी धडपडणाऱ्या मंचक इंगळे यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे पिकविम्यासाठी शेतकऱ्यांची कशी बिकट अवस्था होत आहे, हे समोर आले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











