👁 7 Views

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे आरोग्य शिबीर संपन्न

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

 श्रध्दा हॉस्पिटल येथील आरोग्य शिबीराचे उद्घाटन करताना मान्यवर 

पंढरपूर Live 4 August 2017

प्रतिनिधी 
रोपळे : ग्रामीण परिसरातील रूग्णांना आजच्या महागाईच्या काळामध्ये महागडे उपचार घेता येत नाही. अशा रूग्णांनाही आरोग्य सेवचा लाभ म्हणून  पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील श्रध्दा हॉस्पिटलच्यावतीने सामाजिक  बांधिलकी जोपासत डॉ.हनुमंत खपाले व डॉ. अनुजा खपाले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. यामध्ये रोपळे पंचक्रोशीतील चारशे रूग्णांनी आपली तपासणी करून घेतली.
या आरोग्य शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी सहाकर शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ, डॉ.महावीर शहा, नागनाथ माळी, रावसाहेब भोसले, बाळासाहेब भोसले, अशोक पाटील, पोपट भोसले, मधुकर भोसले, रघुनाथ भोसले यांचेसह न्यु गोल्डन तरूण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तर या आरोग्य शिबीरामध्ये डॉ.सुरज पाचकवडे, डॉ.विजय सरडे, डॉ.गिरनार गवळी यांनी रूग्णांची तपासणी केली व पुढील उपचारासाठी सल्ला देवून मार्गदर्शन केले. तर तपासणीनंतर रूग्णांना मोङ्ग त औषध वाटप करण्यात आले.  तसेच कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ.खपाले यांनी आयोजीत केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *