👁 7 Views

श्री संत चोखोबा यांच्या मंगळवेढा येथील स्मारकासाठी आ.भारत भालके विधीमंडळात आक्रमक

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 4 August 2017

पंढरपूर ः दि.4 –  सध्या चालू असलल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शुक्रवार  दि.04.08.2017 रोजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी विधानमंडळात आपल्या मतदार संघातील मंगळवेढा,जि.सोलापूर येथे श्री संत चोखोबा यांचे स्मारक स्थापन करणेबाबतच्या विषयावरील औचित्याच्या मुद्दयाव्दारे आक्रमक भूमीका घेतली. महाराष्ट्रात नव्हेतर देशभरात प्रसिध्द असलेली भू-वैकुंठभूमी पंढरपूर देवाची भूमी येथील ब्रम्हांड नायक श्री विठ्ठलाचा निसीम भक्त म्हणून ख्याती असलेले थोर संत श्री चोखोबा हे एक दलित संत असून त्यांच्या स्मारकाबाबतची सर्व वारकरी सांप्रदायाची अनेक वर्षापासूनची मागणी शासनाकडे प्रलंबीत आहे. श्री संत चोखोबा यांच्या स्मारकाबाबत शासनाकडे प्रस्ताव येवूनसुध्दा त्यावर अद्यापही निर्णय झालेला नसल्यामुळे सर्व समाजामध्ये तसेच वारकरी सांप्रायदायामध्ये नाराजीची भावना आहे. आजही हे संत नामदेव पायरीवरच आहेत. श्री संत चोखाबा यांनी आपल्या अभंगात ऊस ढोंगापरी रस नाही ढोंगा । काय भुललाशी वर्लीया रंगा ॥ या आपल्या अभंगातून सार्‍या मानव समाजाचे प्रबोधन करणारे श्री संत चोखोबा यांचे उचित स्मारक स्मृती स्थळ त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे मंगळवेढा येथे लवकरात लवकर उभे करणेबाबत आमदार भालके यांनी शासनाकडे जोरदार मागणी केली.

आमदार भालके यांनी या औचित्याच्या मुद्दयाव्दारे मंगळवेढा येथे श्री संत चोखोबा यांचे स्मारक उभारणीबाबत आक्रमक भूमीका घेत संतांच्या हजारो वर्षापासूनच्या समता बंधूंता या विचारांचा विसर या सरकारला कसा पडला आहे? असा सवाल केला. मंगळवेढा हे 12 व्या शतकापासून संत भूमी म्हणून प्रसिध्द आहे. मंगळवेढा या संत भूमीला संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत दामाजी, संत कर्ममेळा अशा संतांची परंपरा आहे. अनेक भाविक भक्त महाराष्ट्रासह कर्नाटक-आंध्र या भागातून दर्शनासाठी येथे येतात. म्हणून श्री संत चोखोबा यांचे उचित स्मारक स्मृती स्थळ त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे मंगळवेढा,जि.सोलापूर येथील नगरपालिका हद्दीत शासनाच्या जागेत लवकरात लवकर  उभे करावे, अशी ठोस मागणी आमदार भारत भालके यांनी सभागृहामध्ये केली.

………………………………………………………………………………………………………………………

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *