- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
उजनी आणि वीर धरणातून मोठा विसर्ग सुरू केल्यामुळे येथील चंद्रभागा नदीला पूर आला असून, काठावरील भक्त पुंडलिक यासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. सध्या वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून घाटांना पाणी लागले आहे. भीमा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीसह इतर सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली आहे. पंढरपूर शहरासह नदीकाठच्या गावातील लोकांनादेखील सुरक्षित स्थळी हलवण्याच्या तयारीला प्रशासन लागले आहे.
दरम्यान आज एकादशी असल्यामुळे भाविकांची आज व उद्याही चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गर्दी होत असते. स्नान करताना भाविकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे

उजनी धरणातून ७० हजार क्युसेक आणि वीर धरणातून १३ हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग भीमा नदीत करण्यात येत आहे. यामुळे पंढरपुरातील भीमा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहात आहे. या पुरामुळे वाळवंटातील भक्त पुंडलिकसह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठी राहणाऱ्यांचे स्थलांतर केले आहे.
जिल्ह्याची वरदायिनी ठरलेली उजनी धरण १०९ टक्के भरले आहे. सध्या उजनी धरण क्षेत्र आणि पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे ही पूर्णक्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग भीमा नदीला येऊन मिळतो. तर वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी नीरा नरसिंगपूर येथील संगमातून भीमा नदीत येते. यामुळे भीमेच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी उजनी धरणातून ७० हजार क्युसेक, तर वीर धरणातून १३ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तर दौंड येथून २८ हजार कुसेक पाणी उजनी धरणात येत आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


