- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मुंबई, दि. 15 : आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राने राबविलेल्या अभिनव योजना तसेच माता व बालमृत्यू रोखण्यासाठी केले जाणारे प्रयोग याबाबत जाणून घेण्यासाठी उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची आज मंत्रालयात भेट घेतली. दोन्ही राज्यांच्या आरोग्य सेवेत अधिक सुधारणा करण्यासाठी आंतरराज्य समन्वय राखण्यात येईल, डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य सेवेच्या बाबतीत देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य असून तेथील विविध योजनांचा आणि यशकथांचा अभ्यास करावा असे केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी सूचविले होते. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलो असून, टेलिमेडीसीन, मोटरबाईक ॲम्बुलन्स, एसएनसीयू ,सीपीएस कोर्स अशा अनेक योजना उत्तरप्रदेशातील आरोग्य क्षेत्रात राबविण्यासाठी महाराष्ट्राचे सहकार्य घेतले जाईल, असे उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
दुपारी बाराच्या सुमारास आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या दालनात ही भेट झाली. यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजीव कुमार, संचालक डॉ. सतीश पवार यांच्यासह उत्तरप्रदेश आरोग्य विभागाच्या सचिव श्रीमती हेकाली झिमोमी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे पंकज कुमार, बाल आरोग्य विभागाचे उप महाव्यवस्थापक डॉ. अनिल वर्मा उपस्थित होते.
यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांविषयी सादरीकरण केले. उत्तरप्रदेशच्या शिष्टमंडळाने राज्याची आरोग्य यंत्रणा समजावून घेतली.
विभागामार्फत सुरु असलेल्या कॉलेज ऑफ फिजीशियन अभ्यासक्रमाबाबत डॉ. सावंत यांनी माहिती दिली. राज्यात या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. त्यावर उत्तरप्रदेशातही महाराष्ट्राच्या या मॉडेलचा अभ्यास करुन तो राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या टेलिमेडीसीन प्रकल्पाबाबत उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री प्रभावित झाले. उत्तरप्रदेशमध्ये शासकीय विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता असून या कामी महाराष्ट्रातील टेलिमेडीसीन सेवेचे सहकार्य देण्याबाबत त्यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना विनंती केली.
यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजना, बाईक ॲम्बुलन्स, ब्लड ऑन कॉल, एसएनसीयूमधील बालकांची घेण्यात येणारी काळजी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत बालकांवर झालेल्या शस्त्रक्रिया, प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना त्याचबरोबर प्राथमिक आरोग्यकेंद्रांना सौर ऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा, आशा कार्यकर्तीच्या माध्यमातून होणारी आरोग्य सेवा याबाबत उत्तरप्रदेशाच्या आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे कौतुक केले. या सर्व उपाय योजनामुळे महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात देशात अग्रेसर राज्य असून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील अभिनव योजनांचा अभ्यास करावा तसेच येथील प्रशासकीय संरचनेचा अभ्यास याबाबत सूचना केली. त्यानुसार उत्तरप्रदेशमधील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्राचे सहकार्य घेतले जाईल, असे उत्तरप्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.
उत्तरप्रदेशमधल्या कानपूर, बनारस, आग्रा, मेरठ यासारख्या शहरांमधील असणाऱ्या छोट्या छोट्या गल्लींमधून वाट काढत आरोग्य सेवा देण्यासाठी बाईक ॲम्बुलन्स महत्वपूर्ण ठरणार असल्याचे उत्तरप्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राने माता व बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे संपूर्ण देशात त्यांचा माता व बालमृत्यूदर कमी असून महाराष्ट्राने राबविलेल्या उपाययोजना उत्तरप्रदेशातही अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन त्यात सुधारणेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री व टीमला उत्तर प्रदेशात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



