👁 9 Views

चंद्रभागेत वाहून गेलेल्या सौ. वंदना सुरेश बनकर यांचा मृतदेह चळे गावानजिकच्या नदीपात्रात मिळाला… मजुरी करुन उदरनिर्वाह करणार्‍या दोघा पत्नी-पत्नींचा करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ..! आई-वडिलांविना पोरकी झाली बनकरांची दोन मुलं…

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 16 september  2017 
दि. 14 सप्टेंबरच्या रात्री पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथील बंधार्‍यावरुन दुचाकीवरून प्रवास करणारे सांगोला तालुक्यातील वाहुन गेलेल्या पती-पत्नी पैकी पती सुरेश बनकर यांचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी पंढरपूर तालुक्ूयातील नळी येथील नदीपात्रात आढळून आला होता. त्यांच्या पत्नी सौ. वंदना सुरेश बनकर यांचे शोधकार्य सुरू होते. आज दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचा मृतदेह पंढरपूर तालुक्यातील चळे गावानजीकच्या नदीपात्रात आढळून आला.
स्थानिक नागरिक, एसडीआरएफ पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर या दोघांच्या मृतदेहाचा शोधण्यात पंढरपूर तालुका पोलिसांना यश आले. चंद्रभागेच्या पात्रात वाहुन गेलेल्या या दोन्ही पती-पत्नीचा अशा प्रकारे करुण अंत झालेल्या या दुर्घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
झाली बनकरांची दोन मुलं… 

बनकर कुटूंबिय हे सांगोला येथे मजुरी करुन आपला व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्‍चात एक इयत्ता नववीमध्ये तर दुसरा इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेली अशी दोन मुलं आहेत. आईवडीलांचा एकमेव आधारच अचानक नाहीसा झाल्याने या दोन्ही मुलांचं छत्रंच जणु हरवलं आहे. आईवडीलांव्यतीरिक्त कुणाचाही आधार नसलेली ही मुलं आता पोरकी झाली आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळावे अशी मागणी होत आहे.

 अशी घडली ही दुर्घटना…!

 पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथिल बंधार्‍यावरुन पाणी वाहत असतानाही सांगोला तालुक्यातील  पती पत्नी दुचाकीवरून जात असताना भीमा नदीत वाहून गेल्याची दुर्घटना काल गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान घडली.  सांगोला पुजारवाडी येथील सुरेश विष्णु बनकर (वय 45)  आणि त्यांच्या पत्नी सौ. वंदना सुरेश बनकर (वय 32) हे दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे वंदना यांच्या आजारी मावशीला भेटण्यासाठी गेले होते . संध्याकाळी 7 च्या सुमारास ते अनवली गावाला जाण्यासाठी निघाले . परंतु बंधार्‍यावरुन जात असताना पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून बंधार्‍यावरुन प्रवास करताना मोटारसायकलसह दोघे वाहुन गेल्याची दुर्घटना घडली.
अनवली हे सौ. वंदना यांचे माहेर होते . रात्रीचा मुक्काम माहेरी करुन हे दांपत्य सकाळी सांगोल्याला आज आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. भीमा नदीत उजनी धरणातुन 40 हजार क्यूसेकचा विसर्ग भीमेत सोडल्याने नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुढेवाडी बंधार्‍यावर देखील पाणी आल्याने दुचाकीवरुन जाणारे बनकर दांपत्य वाहून गेले असुन स्थानिकांनी  दुर्घटना घडली तेंव्हाच  मदतकार्य सुरु केले होते पण अंधार असल्याने अडचणी निर्माण झाल्या. तेंव्हापासून या दांपत्याचे शोधकार्य सुरू होते. काल सायंकाळी सुरेश बनकर यांचा मृतदेह नळी येथील नदी पात्रात सापडला तर आज सकाळी त्यांच्या पत्नीचाची मृतदेह मिळाला.  या घटनेमुळे बनकर यांच्या गावासह सांगोला व पंढरपूर तालुक्यातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बनकर यांच्या पुजारवाडी, ता.सांगोला या गावावर शोककळा पसरली आहे.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *