……………………………..
Lord Vitthal | श्रावण सोमवार समाप्ती निमीत्त श्रीविठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात फुलांची आरास
………………………………………
Pandharpur Live Online: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांचा रविवारचा परळी दौरा वादग्रस्त ठरला. त्यांनी शहरात प्रवेश करताच मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करुन त्यांना घेराव घातला. दरम्यान, त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली. सायंकाळी करुणा शर्मांवर ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. याबाबत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

करुणा शर्मा प्रकरणात सखोल चौकशी व्हायला हवी, आपल्या देशामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हीडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ते नागपुरात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याच्या मुद्दयावरून भाजपला फटकारले होते. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपला फटकारले होते. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

ही आघाडी सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडतात. प्रत्येकजण सुभेदार असल्यासारखा वागतोय. प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नाही लचके तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशाप्रकारची अवस्था या आघाडीची पहायला मिळतेय, असा घणाघात फडणवीस यांनी केला. “मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी काहीही बोलणार नाही. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं”, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला.

