👁 1,921,905 Views

स्वेरीमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा; उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्यावर होणारे संस्कार महत्त्वाचे -ॲड.सुनीता साळसिंगीकर

स्वेरीमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा; उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्यावर होणारे संस्कार महत्त्वाचे -ॲड.सुनीता साळसिंगीकर

व्यवस्था, नातेसंबंध, व्यवहारज्ञान यावर देखील भर दिला पाहिजे.’ असे सांगून अॅड. साळसिंगीकर यांनी अनेक कर्तबगार महिलांची उदाहरणे देताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ, अंतराळ कन्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या सारख्या कर्तबगार महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनतर अध्यक्ष स्थानावरून बोलताना स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘कोणत्याही प्रसंगांना सामोरे जात असताना आपल्याला नवनवीन बाबी शिकायला मिळत असतात. त्यामुळे समाजात वावरताना याच बाबी उपयोगी पडतात.

त्या शिकून घेतल्या पाहिजेत. मिळणाऱ्या यशानं हुरळून जायचे नाही आणि जर दु:ख वाट्याला आले तर खचून जायचे नाही. हाच जीवनाचा मार्ग आहे.’ असे सांगून त्यांनी यशस्वी महिलांचा संघर्षात्मक प्रवास सांगितला. ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने विविध विभागात गुणवत्तेत आलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर अॅड. सुनीता साळसिंगीकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या स्वेरी लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ.पी.एस. बनकर, डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ.डी.ए. तंबोळी, प्रा.व्ही.डी.जाधव, 

इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, इंजिनिअरिंग, फार्मसीच्या पदवी व पदविका व स्वेरी लॉ कॉलेज या पाचही महाविद्यालयांतील प्राध्यापिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या विभागप्रमुख डॉ.नीता तळवळकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. यशपाल खेडकर यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *