👁 99 Views

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी..अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांतून समाजपरिवर्तनाची प्रेरणा

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी..अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांतून समाजपरिवर्तनाची प्रेरणा

पंढरपूर वार्ताहर : कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पंढरपूर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मोरे यांनी मार्गदर्शन करताना अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक समतेसाठीचे योगदान आणि कष्टकरी, वंचित समाजाला दिलेली प्रेरणा यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकीही जपावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विद्यार्थिनी कु. सना काझी हिने अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. नवनाथ करांडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनासाठी असलेला प्रभाव अधोरेखित केला.

या कार्यक्रमासश्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, रजिस्ट्रार गणेश वाळके, महाविद्यालयातील अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बी.फार्मसी व डी.फार्मसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री. विशाल वाघमारे यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *