👁 2,785,460 Views

Solapur Crime News : सोलापूरमध्ये रिक्षा चोरी व घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद

Solapur Crime News :  सोलापूरमध्ये रिक्षा चोरी व घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद

रिक्षा चोरी व घरफोडीचा गुन्हा करणाऱ्या दोन गुन्हेगारांना जेलरोड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हा घडल्यापासून २४ तासाच्या आत जेलरोड पोलिसांनी हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला.

रोहित रविद्र जाधव (वय ३२, रा. शाहीर बस्ती, भवानी पेठ, सोलापूर) आणि अनिल लक्ष्मण मंजुळकर (वय २२, रा. अशोक चौक, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.२७ फेब्रुवारी रोजी मार्केट यार्ड येथून २ लाख ५० हजार रुपये किंमतीची रिक्षा चोरी झाल्याबाबत तसेच ५ मार्च रोजी सुधाकर व्यकटेश सिंघम यांचे राहते घरातून ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एकूण २९ ग्रॅम सोन्याचे चैन चोरी झाल्याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड पोलिसांना एक व्यक्ती ही चोरीच्या गुन्ह्यातील एक रिक्षा विक्रासाठी अक्कलकोट रोड स्मशानभूमीजवळ येणार असल्याची बातमी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रोहित जाधव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला

असता त्याने त्याचा मित्र विकास सुरेश जाधव (वय ३२, रा. माने यांचे घरात भाडयाने, निराळे वस्ती सोलापुर) याचेसोबत मिळून चोरी केली असल्याची कबुली दिली. या आरोपीकडून ३ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे. तसेच अशोक चौकातील चिप्पा मार्केट येथे चोरीचे सोन्याचे दागिने बिक्रिसाठी आलेल्या अनिल लक्ष्मण मंजुळकर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सिंगम यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांचे मार्गदर्शनाखाली बरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार शरिफ शेख, गजानन कणगिरी, एम. डी. नदाफ, पोलीस हवालदार बसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल बहाब शेख, अयाज बागलकोटे, पोलीस नाईक भारत गायकवाड, पोलीस शिपाई इकरार जमादार, उमेश सावंत, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे, विठठल जाधव, अर्जुन गायकवाड यांनी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *