👁 28,964,219 Views

पंढरपूरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

पंढरपूरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

पंढरपूर दि(10)- पोलिसाची नोकरी व कुटुंब यांची यशस्वी सांगड घालून विविध आव्हानांचा सामना करीत गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास समुपदेशनाद्वारे मोडणारे संसार वाचवणे त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे व शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व शालेय विद्यार्थ्यांनीचा सन्मान करण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्यावतीने पोलीस संकुल पंढरपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या समाजव्यवस्थेत स्त्रिया कुटुंब, सेवा, शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने कार्य करत आहेत. तसेच सर्वच क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. जिद्द, निष्ठा आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तसेच समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीतही मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांचा सन्मान करण्याचा नाही, तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा असल्याचे मत सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी यावेळी व्यक्त केले.


यावेळी पंढरपूर उपविभागातील महिला अधिकारी ,पोलीस ठाणे येथील महिला पोलिस अंमलदार तसेच पंढरपूर शहरातील प्रतिष्ठीत महिला, डॉक्टर , महाविद्यालयीन शिक्षिका व शालेय विद्यार्थिनी यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *