👁 4 Views

मोहोळ: मिनीबस , कंटेनर व मोटरसायकल या तिहेरी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू, अन्य 15 जन जखमी

मोहोळ: मिनीबस , कंटेनर व मोटरसायकल या तिहेरी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू, अन्य 15 जन जखमी

मोहोळ; मिनीबस, कंटेनर व मोटरसायकल या तिहेरी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य 15 जण जखमी झाले. जखमी पैकी 11 जणांवर मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य चार जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळेगाव फाट्यावर दुपारी अडीच वाजता झाला. या अपघाता मुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दयानंद सदा भोसले रा लांबोटी ता मोहोळ असे मृताचे नाव आहे. तर प्राची पांडुरंग मांढरे वय 32, छाया रतन शेडगे वय 35, रेखा दत्तात्रय चौधरी वय 33, कोमल अनिल जोरकर वय 32, भक्ती पांडुरंग मांढरे वय 16, बेबी सुधाकर गायकवाड व 32, कोमल सचिन मांडरे वय 21, रेश्मा नितीन चौधरी वय 35, सोनाली रमेश आडुळकर वय 31, सपना रमेश मोहिते वय 40, अश्व अरुण खाडे वय 5, परी अनिल जोरकर वय 6, सई गोरख मांढरे वय 9, सर्व रा कुसगाव ता भोर जि पुणे अशी जखमींची नावे आहेत.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, मिनी बस क्रमांक एम एच 21 के क्यू 1175 मधून वरील सर्वजण तुळजापूर, अक्कलकोट या ठिकाणचे देवदर्शन करून पंढरपूर कडे दर्शनाला निघाले होते. दुपारी अडीच वाजता ही मिनीबस कोळेगाव फाट्यावर आली असता अचानक रस्ता ओलांडणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच 13 सीएन 335 वरून निघालेल्या दयानंद सदा भोसले रा लांबोटी यांना पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एन एल 01/ ए ए 7205 याने जोराची धडक दिली, व तशीच मिनी बसला रॉंग साईडने येऊन मध्यभागी धडक दिली.

त्यामुळे मिनीबस रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाली. त्यामुळे वरील 15 जण जखमी झाले. अपघात होताच कंटेनर चालक पळून गेला. मोटरसायकल वरील दयानंद सदा भोसले रा लांबोटी हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सोलापुर येथील रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मयत म्हणून घोषित केले. तर सई मांढरे, सोनाली आडुळकर, रेखा चौधरी व चालक लक्ष्मण पवार यांना सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची फिर्याद तेजस्विनी मयूर मांढरे वय 20 रा कुसगाव ता भोर यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस अंमलदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *