👁 3 Views

मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम, कुटुंबियांचा लग्नास नकार, धावत्या एसटीत तरुणीच्या भावाला संपवलं , अखेर…….

मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम, कुटुंबियांचा लग्नास नकार, धावत्या एसटीत तरुणीच्या भावाला संपवलं , अखेर…….

पुणे; धावत्या एसटीत मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीये. खेडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एसपी पोळ यांनी ही शिक्षा सुनावली असून अजित कान्हूरकर असं आरोपीचं नाव आहे.

मामाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून पुण्याच्या खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. १२ जून २०१८ ला घडलेल्या हत्येचा तब्बल साडे सहा वर्षानंतर निकाल लागलाय. अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते, त्यामुळे मामाचा आणि मुलीचाही लग्नास नकार होता. या रागातून मामाचं कुटुंब संपवायचं अजितने ठरवलं. याची सुरुवात मामाचा १८ वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसे पासून त्याने केली.

श्रीनाथ आणि मामाची लहान मुलगी एसटीतून खेडच्या दिशेने निघाले. त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या अजितने धारदार शस्त्राने सपासप वार केले. अटकेनंतर ही अजित तुरुंगातून पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता. इतकंच नव्हे तर थेट न्यायाधीशांच्या समोरही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहता आरोपी तुरुंगाबाहेर आला तर मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता अजितला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील म्हणून सागर कोठारी यांनी कामकाज पाहिलं

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांकडूनही कडक कारवाई करण्यात येत आहे. आरोपींना अद्दळ घडवण्यासाठी पुणे पोलिसांनी पॅटर्न राबवलाय. जिथं गुन्हा केला तिथेच आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे. गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *