पंढरपूर, दि.03:- माघी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांकडून नामदेव पायरी व मंदीर परिसरात नारळ फोडण्याने नारळाचे पाणी रस्त्यावर येवून चिखल व घसरंती होण्याची शक्यता आहे. तसेच विक्रेते नारळाची साल काढून मंदिर व मंदिर परिसराच्या बाजूस टाकल्याने केसरास आग लागण्याची शक्यता असल्याने. श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दि. 06 ते 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नारळ फोडण्यास व विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत.
मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व विक्रीस मनाई


