पंढरपूर, दि. 09 :- माघ शुध्द एकादशी 08 फेब्रुवारी 2025 रोजी असून, माघ यात्रा कालावधी दि. 02 ते 12 फेब्रुवारी आहे. या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या वारी कालावधीमध्ये दि.07 ते 09 फेबुवारी 2025 या कालावधीत पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन उपविभागीय दंडाधिकारी श्री.इथापे यांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत.
शहरात मांस, मटण विक्रीस मनाई


