👁 6 Views

डम्परचे चाक डोक्यावरून गेले, भरधाव वाहनांच्या धडकेत २ दुचाकीस्वारांचा मृत्यू …….

डम्परचे चाक डोक्यावरून गेले, भरधाव वाहनांच्या धडकेत २ दुचाकीस्वारांचा मृत्यू …….

पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर रस्त्यावरील अष्टापूर भागात घडली. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजी उत्तम खोत (वय ५७, रा.दत्तवाडी, उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत बालाजी विलास खोत (वय ४३, रा. दत्तवाडी, उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवाजी खोत हे १७ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नगर रस्ता भागातील अष्टापूर ते उरळी कांचन रस्त्याने निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार खोत यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या खोत यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *