👁 4 Views

गाडीला ठोकलं ,३ महिलांना उडवलं , १२ गाड्यांना चिरडत गेला कंटेनर …..

गाडीला ठोकलं ,३ महिलांना उडवलं , १२ गाड्यांना चिरडत गेला कंटेनर …..

चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनर कडून दहा ते बारा गाड्यांना ठोकर दिली. चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले, मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला.

पोलिसांनी ही पाठलाग सुरू केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना ठोकर देत राहिला.

एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते, तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले. या थरारक घटनेचे व्हिडीओ समोर आला आहे. चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर चालका गाड्यांना उडवलं आहे. या विचित्र अपघातामुळे खळबळ उडाली असून ट्रॅफिक जाम देखील झालं.

अपघातात अनेक जण जखमी ही झालेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल केलं. चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिलाय. शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. अपघातात मोठी वित्त हानी झाली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संतप्त जमावाकडून कंटेनर चालकाला मारहाण केली. कंटेनर चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. शिक्रापूर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या गाडीचे नुकसान झालं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *