👁 3 Views

गोड बोलुन बिअर पाजली , नशा चढताच पत्नीकडून पतीचा घात, प्रियकराला बोलावलं अन्………

गोड बोलुन बिअर पाजली , नशा चढताच पत्नीकडून पतीचा घात, प्रियकराला बोलावलं अन्………

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. आरोपी महिलेनं अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.

याप्रकरणी दापोली पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. दोघांनीही हत्येची कबुली दिली आहे. या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

निलेश बाक्कर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो दापोली तालुक्यातील गिम्हवणे इथं आपली पत्नी नेहा बाक्कर हिच्यासह राहत होता. निलेशचा सलूनचा व्यवसाय होता. सोमवारी सकाळी अचानक निलेश गायब झाला होता. निलेश घरातून बेपत्ता झाल्याचं समजल्यानंतर निलेशच्या भावानं दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी निलेशचा शोध घेण्यासाठी घरातील लोकांची चौकशी केली. यावेळी निलेशची पत्नी नेहा उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला नेहा बाक्करला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली. प्रियकर मंगेश चिंचघरकर याला हाताशी धरून पतीची हत्या केल्यचं तिने सांगितलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नेहा बाक्कर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी ती तिच्या प्रियकरासह दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. नेहाने एका बियर शॉपीवरून बियर खरेदी केल्याचं देखील सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं.

हा सगळा घटनाक्रम जोडल्यानंतर पोलिसांनी नेहाला ताब्यात घेत तिची चौकशी केली. तिनेच पतीला बिअर पाजून प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी प्रियकर मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे. तो मंडणगड डेपोची बस दापोलीला घेऊन आला असता पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे. आरोपींनी निलेशची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकला होता. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या कटात आणखी किती जण सहभागी होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *