वडुज: अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलीस शनिवारी (ता. ११) फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडितेच्या नातेवाईकांनी दिली होती.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित ज्ञानेश्वर प्रल्हाद नामदास (वय २१, रा. सातेवाडी, ता. खटाव) यास शिंदेवाडी- नातेपुते (ता. माळशिरस) येथून मंगळवारी (ता. १४) ताब्यात घेतले, तर दुसऱ्या घटनेत एका अल्पवयीन मुलीस रविवारी (ता. १२) अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली होती.
त्यामध्ये संशयित अमोल आप्पासाहेब बडे (रा. केकत- जळगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे


