👁 3 Views

बारामती : राग अनावार झाला अन् बापानेच पोटच्या मुलाचा जीव घेतला

बारामती : राग अनावार झाला अन् बापानेच पोटच्या मुलाचा जीव घेतला

पुणे: जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभ्यास करीत नाही याचा राग मनात धरुन बापानेच पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.या घटनेमुळे बारामतीव तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आरोपी वडिलांनी गुन्हा लपण्यासाठी मोठा प्लॅन देखील आखल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्याच्या पत्नीने देखील साथ दिल्याचे समोर आले आहे.

१४ जानेवारीला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पियुष वय ९ वर्ष घरात असताना त्याचे वडील विजय भंडवलकर यांनी त्याला अभ्यासाविषयी ओरडा केला. यानंतर तू सारखा बाहेर खेळतोस, तुझी आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस,” असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. धक्कादायक म्हणजे यावेळी त्यांची पत्नी शालन विजय भंडलकर हे देखील तिथे होती, पण तिने पतीला अडवले नाही.

या प्रकरणी पोलिसांनी विजय गणेश भंडलकर, शालन विजय भंडलकर, आणि संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी माहिती मिळताच विजय भंडलकर व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *