👁 11 Views

संशोधनात्मक स्पर्धेमुळे अभियंत्यांना ऊर्जा मिळते – कोकिओ कॅम्लीनचे उपाध्यक्ष डॉ.माणिकराव साळुंखे

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 20 september  2017 


स्वेरीमध्ये ‘ऑलंम्पस २०१७’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेचा समारोप
पंढरपूर- ‘स्वेरीमधील ‘ऑलंम्पस २०१७’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धा कार्यक्रमपाहता मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी एक ऊर्जा मिळाली. प्रत्येकाचे प्रकल्प, पेपर्स, विविध मॉडेल्स यामुळे भविष्यात अभियंत्यांना यापेक्षाही जास्त मागणी असणार आहे. भारताच्या जडण घडणीत अभियंत्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे. यासाठी अभियंत्यांना प्रचंड परिश्रमाची गरज आहे. आपल्या अभ्यासात गुरूंना महत्व द्या. त्यांचे कल्पक नेतृत्व व नियोजन यामुळे आपल्यातील चुका कमी होवून हाती घेतलेल्या कार्यात अचूकता येईल.’ असे प्रतिपादनकोकिओ कॅम्लीन कंपनीचे उपाध्यक्ष  डॉ.माणिकराव साळुंखे  यांनी केले.
       येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘ऑलंम्पस २०१७’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धा कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमूख पाहूणे म्हणून कॅम्लीनचे उपाध्यक्ष डॉ.साळुंखे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संघाचे अध्यक्ष व शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूजचे प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी बाहेरून आलेले स्पर्धक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून ‘ऑलंम्पस २०१७’ या संशोधनात्मक स्पर्धा आयोजिण्यामागील भूमिका स्पष्ट केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, ‘अभियंत्यांना नवनवीन संकल्पना सुचल्या पाहिजेत. म्हणुन स्पर्धेच्या युगात आता अथक परिश्रमाची गरज आहे. यासाठी तुमच्याकडील ज्ञान अपडेट ठेवावे. केवळ ज्ञान मुबलक असून चालत नाही त्याच्या योग्य ठिकाणी, योग्य वापर केला पाहिजे.  या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास ३० महाविद्यालयातील एकूण १४०० स्पर्धक आले होते तर या स्वेरीतील जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यापैकी बाहेरील विद्यार्थ्यांना स्पर्धेत अधिकाधिक प्राधान्य देवून जवळपास दोन लाखांची बक्षिसे देण्यात आली. सोबत स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सध्याच्या स्पर्धेच्या युगात ‘डिझीटल इंडिया’च्या प्रवाहात वाहून घेताना विजेत्या स्पर्धकांना ऑनलाईनद्वारे बक्षिसाची रक्कम त्यांच्या खात्यात भरण्यात आली. यावेळी स्पर्धकांची भोजन व निवास्थानासह इतर व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धक दोन्ही दिवस उत्साहाने रमले होते. यावेळी सोलापुरातील डब्ल्यू.आय.टी.मधील सानिया मकानदार व इस्लामपूर आर.आय.टी. मधील धीरज निने यांनी आपल्या मनोगतात ‘कार्यक्रमाचे नियोजन अप्रतिम व आम्हा स्पर्धकांच्या सर्व सोई केल्यामुळेच स्पर्धेत आम्ही हिरीरीने सहभागी झालो. स्पर्धेचा सराव करताना येथील विद्यार्थ्यांनी व प्राद्यापकांनी अप्रतिम असे सहकार्य केले.’ असे सांगितले. यावेळी कुर्डूवाडीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. पाटील, बार्शी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.गोरे,संस्थाअंतर्गत असणाऱ्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी,ऑलंम्पस २०१७ चे समन्वयक प्रा. डी.टी. काशीदविद्यार्थी सचिव गणेश सुरवसे, प्रा.यशपाल खेडकर,कोमल पाटील, समर्थ उफळकर, आदेश मनगिरे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कॅम्पसमधील विविध संशोधनात्मक साहित्य, मॉडेल्स यांच्या समोर बाहेरून आलेले विद्यार्थी व स्पर्धक सेल्फी घेत होते. सूत्रसंचालन अक्षय टोपगे, विजया गुंड व अंजली मासाळ यांनी केले तर आभार ऑलंम्पस २०१७ चे विद्यार्थी अध्यक्षा मृणालिनी माने यांनी मानले.    
छायाचित्र- १.ऑलंम्पस २०१७  च्या समारोप कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करताना कोकिओ कॅम्लीन कंपनीचे उपाध्यक्ष  डॉ.माणिकराव साळुंखे  सोबत  डावीकडून संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, सोबत प्राचार्य संघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब  देशमुख, ऑलंम्पस २०१७ चे समन्वयक    प्रा. डी.टी. काशीद व सोबत इतर मान्यवर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोकिओ कॅम्लीन कंपनीचे उपाध्यक्ष  डॉ.माणिकराव साळुंखे  सोबत डावीकडून संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य  डॉ.बी.पी.रोंगे, सोबत प्राचार्य संघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख, ऑलंम्पस २०१७ चे समन्वयक प्रा. डी.टी. काशीद व सोबत इतर मान्यवर.
३. प्रमुख पाहुणे कोकिओ कॅम्लीन कंपनीचे उपाध्यक्ष डॉ.माणिकराव साळुंखे  यांचे स्वागत व सत्कार करताना संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, सोबत प्राचार्य संघाचे डॉ. आबासाहेब देशमुख
४. बक्षिस स्वीकारताना इस्लामपूर महाविद्यालयाची विजेती स्पर्धक केतकी डोंगाडे.
    ऑलंम्पस २०१७ स्पर्धेमधील काही क्षण– .रोबोटिक्स  .लेथ वॉर .

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *