👁 9 Views

ऊस उत्पादकता वाढीसाठी युटोपियन शुगर्स अग्रेसर :डॉ.अजित इंगळे

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 20 september  2017 

                ऊस उत्पादकांच्या प्रति आपलेपणाची भावना असणारा व नाविन्याचा शोध घेत ऊस उत्पादकांच्या ऊस उत्पादकतेत वाढ व्हावी . यासाठी नवनवीन योजना राबविणारा युटोपियन शुगर्स हा साखर कारखानदारीत आपला वेगळा आदर्श निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ : अजित इंगळे यांनी केले . 
                  युटोपियन शुगर्स आयोजित हुमणी उच्चाटन  पर कार्यक्रमात श्री . इंगळे हे बोलत होते . युटोपियन शुगर्स ने हुमणी या रोगापासून ऊसाचे सरंक्षण  व्हावे  . याकरिता आष्टी , पेनूर , पापरी , काथेवाडी  ;गोटेवाडी , सय्यदवरवडे व तुंगत येथील आयोजित चर्च्या सत्रामध्ये  डॉ : इंगळे यांनी थेट ऊस उत्पादकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले . पुढे बोलताना डॉ : इंगळे म्हणाले पावसाच्या    लहरीपणामुळे जून च्या सुरुवातीस खंड पडल्यामुळे मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच ऊस उत्पादकांच्या ऊसास हुमणी आळीचा पादुर्भाव झाला आहे . 
त्यामुळे ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे . ऊस उत्पादकांच्या प्रति नेहमीच संवेदनशील असणाऱ्या  युटोपियन शुगर्स टीमने या हुमणी आळीचे समूळ उच्चाटन  करण्यासाठी एकात्मित किड  व्यवस्थापन या योजनेमधून जैविक कीटक नाशक , रासायनिक किटक नाशक व मित्र  किडींचा वापर करून युटोपियनच्या ऊस उत्पादकांची ऊस उत्पादकता वाढावी यासाठी युटोपियन टीमने सदर कार्यक्रमाचे आयोजन करून आपली जागृकता कायम ठेवली आहे . 
                     यावेळी स्वागत पर प्रास्ताविक  मध्ये युटोपियन शुगर्सचे संस्थापक  चेअरमन उमेशराव परिचारक म्हणाले कि, सततच्या दुष्काळामुळे अडचणीत असणाऱ्या  ऊस उत्पादकांची प्रति एकरी ऊस उत्पादकता वाढावी व ऊस उत्पादकांचे आर्थिक जीवनमान उंचवावे .यासाठी  आपला  युटोपियन शुगर्स कारखाना नेहमीच प्रयत्नशील असून त्यासाठी स्वतंत्र असे कृषी सेवा केंद्र उभा करण्याचा आमचा मानस आहे . 
           फोटो ओळी :

हुमणी किड रोगाविषयीचे प्रास्ताविक दाखवताना आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ : अजित इंगळे यांच्या समवेत युटोपियन शुगर्सचे संस्थापक चेअरमन उमेशराव परिचारक व कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील दिसत आहेत 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *